शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरसाठी सहाशे रुपये मोजल्यानंतर मिळते सव्वा रुपयाची सबसिडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 14:42 IST

जास्त पैसेही मोजावे लागतात, वाढताहेत तक्रारी

ठळक मुद्देघरपोच सिलिंडर पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतातसिलिंडर घरपोच दिल्यानंतर मॅडम...चहा-पाण्यासाठी पैसे द्याल का?एकीकडे गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड प्रमाणात चढ-उतार होत असते

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ७ लाख २९ हजार १०१ गॅस सिलिंडर धारक आहेत. जिल्ह्यात एकूण ९० गॅस वितरक आहेत. सिलिंडरसाठी ग्राहकांना ६०२ रुपये मोजावे लागतात. घरपोच सिलिंडर पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला ६०२ रुपये दिल्यानंतर ग्राहकांच्या खात्यात महिनाअखेर १ रुपये ३४ पैशांची सबसिडी जमा होते. ही सबसिडी तुटपुंजी आहे, अशी तक्रार ग्राहक करतायत.

घरपोच सिलिंडर पुरवठा करणाऱ्या पुरवठादाराला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. सिलिंडर घरपोच दिल्यानंतर मॅडम...चहा-पाण्यासाठी पैसे द्याल का?, अशी अपेक्षा पुरवठादार करतात. काही पुरवठादार हक्काने पैसे वसूल करतात. याबाबत भारत पेट्रोलियम कंपनीचे जिल्हा समन्वयक राजीव कुमार यांच्याकडे अनेक तक्रारी आलेल्या आहेत. एक्स्ट्रा पैसे वसुली संदर्भात सोलापूर गॅस संघटनेकडून देखील अनेकदा प्रशासनाकडे तक्रार देण्यात आली आहे. याबाबत दिवसेंदिवस तक्रारी वाढत आहेत. तरी एक्स्ट्रा पैसे वसुलीला खीळ बसली नाही.

अनुदानित सिलिंडरची किंमत - ६०२ रुपये

मिळणारी सबसिडी १ रुपये ३४ पैसे

३० ते ५० रुपयांचा फटका

एकीकडे गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड प्रमाणात चढ-उतार होत असते. तर दुसरीकडे ग्राहकांना घरपोच सिलिंडर मिळाल्यानंतर ३० ते ५० रुपये एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतात. एक्स्ट्रा पैसे वसूल केल्याशिवाय पुरवठादार दारातून जात नाहीत. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसतोय.

 

वितरकांना नोटिसा

एक्स्ट्रा पैसे वसुली संदर्भात आमच्याकडे तक्रारी येतात. आलेल्या तक्रारीनुसार आम्ही संबंधित वितरकांना कारणे दाखवा नोटीस देतो. तक्रारीत तथ्य आढळल्यास वितरकांवर आम्ही दंडात्मक कारवाई देखील करतो. आतापर्यंत दोन वितरकांवर कारवाई केलेली आहे. अजून कुणाच्या तक्रारी असल्यास त्यांनी बिनधास्त तक्रार करावी.

- राजीव कुमार

जिल्हा समन्वयक : भारत पेट्रोलियम कंपनी

 

गॅस वितरकाकडून मिळालेल्या पावतीनुसार पैसे द्या. कुणी एक्स्ट्रा पैसे मागत असेल तर पावती मागे ग्राहक संपर्क नंबर आहे, त्या नंबरवर फोन करून तक्रार देऊ शकता. ग्राहकांनी जागरूक राहून तक्रार नोंदवावे. एक्स्ट्रा पैसे कोणी देऊ नयेत.

- रवींद्र जोगीपेठकर

सोलापूर गॅस संघटना

टॅग्स :SolapurसोलापूरPetrolपेट्रोल