शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या काळ्या कोटाला वकिलांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 13:13 IST

मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देणार निवेदन : तालुका पातळीवरील बार असोसिएशनसह सोलापुरातही होणार चर्चा

ठळक मुद्देशिक्षकांना ब्लेझरसह वर्गावर हजर राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण १० हजार शिक्षक कार्यरत

सोलापूर : झेडपी शिक्षकांना केंद्रशाळेने ठरविलेल्या ड्रेसकोडबरोबरच्या काळ्या रंगाच्या ब्लेझरला बार असोसिएशनने विरोध केला आहे. काळा कोट ही वकिलांची ओळख असून, ती इतरांना सारखी राहू नये, असा विचार करण्यात आला आहे. 

दिवाळी सुटीनंतर १९ नोव्हेंबर रोजी सुरू होणाºया शाळेच्या पहिल्या दिवसापासून शिक्षकांना ब्लेझरसह वर्गावर हजर राहण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिले आहेत. शहर व जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण १० हजार शिक्षक कार्यरत आहेत. सर्वांना जर काळ्या रंगाचा ड्रेसकोड झाला तर वकिील आणि शिक्षकांमध्ये फरक जाणवणार नाही. नावलौकिक असलेला व्यवसाय म्हणून वकिलांची ओळख आहे. सर्व जण काळा कोट वापरू लागले तर वकिलांची वेगळी ओळख राहणार नाही. त्यामुळे हा ड्रेसकोड बदलण्यात यावा, अन्यथा त्याचा रंग बदलावा, अशी चर्चा सध्या वकील मंडळींमधून होत आहे. 

काळ्या रंगाचा इतिहास...

  • - ब्रिटिश काळात न्यायाधीश आणि वकील हे काळा गाऊन घालत होते. एकप्रकारची गंभीरता आणि रहस्यमय प्रवृत्तीची छाप दिसावी, हा त्याच्यामागे एक हेतू आहे. काळा रंग त्यांचा उच्चभू्र दर्जा दर्शवतो. हा काळा रंग नि:पक्षपातीपणा आणि अधिकाराचं प्रतीक समजला जातो. न्यायदानाच्या प्रक्रियेत बाह्य प्रभावांना प्रतिकार करण्याची प्रेरणा देतो. 
  • - भारतात १९६१ च्या अ‍ॅडव्होकेट अ‍ॅक्टनुसार देशातल्या सर्व न्यायालयातील वकिलांसाठी हा काळा ड्रेसकोड बंधनकारक आहे. महिला काळ्या कोटसोबत पांढरी साडी नेसू शकतात.

काळा कोट ही वकिलाची ओळख आहे, ती इतर ठिकाणी समान होऊ नये. शहरात १२०० तर जिल्ह्यात तालुका पातळीवर १८०० वकील मंडळी काळा ब्लेझर परिधान करून न्यायालयीन कामकाज पाहतात. यावर बार असोसिएशनची बैठक बोलावून चर्चा केली जाणार आहे. निर्णय घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देणार आहोत. - अ‍ॅड. संतोष न्हावकर, अध्यक्ष, सोलापूर बार असोसिएशन, सोलापूर. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदTeacherशिक्षकCourtन्यायालय