शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीवर प्रशासक; हा तर गावांवर वर्चस्व ठेवण्यासाठी सरकारचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 14:15 IST

सदाभाऊ खोत यांची टीका; दूधदरासाठी १ आॅगस्टला राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार

ठळक मुद्देग्रामपंचायतीची चालू बॉडी रद्द करुन त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येणारग्रामपंचायत सदस्यांना व सरपंचांना मुदतवाढ द्यायला पाहिजेसरकार पालकमंत्री व सीईओंच्या माध्यमातून प्रशासक नेमणार

पंढरपूर : सध्या राज्यातील १५ हजारांपेक्षाही जास्त ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. परंतु कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निवडणुका रद्द झाल्या आहेत. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार पाहण्यासाठी प्रशासक नेमण्याचा खेळ सरकारने मांडला आहे. प्रशासकाच्या माध्यमातून गावात वर्चस्व ठेवण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.

खा. सदाभाऊ खोत हे कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. यावेळी प्रा. सुहास पाटील, नंदू व्यवहारे, छगन पवार, सुनील पाटील, आकाश डांगे, सूरज भोसले, स्वप्निल भोसले, सोमनाथ पाटील, दत्ता मस्के, सोमनाथ भोसले, आण्णा पवार उपस्थित होते.

पुढे खोत म्हणाले, ग्रामपंचायतीची चालू बॉडी रद्द करुन त्या ठिकाणी प्रशासक नेमण्यात येणार आहे. ज्या पध्दतीने सहकारी संस्थेमध्ये संचालकांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्या पध्दतीने ग्रामपंचायत सदस्यांना व सरपंचांना मुदतवाढ द्यायला पाहिजे. परंतु सरकार त्या ठिकाणी पालकमंत्री व सीईओंच्या माध्यमातून प्रशासक नेमणार आहे. स्थानिक नागरिकालाच प्रशासक म्हणून नेमण्यात येणार आहे. गावातील हजार चांगल्या व्यक्तींमधून एका व्यक्तीची कशी निवड करणार आहेत. हे सरकार यासाठी ठेकेदार पध्दतीचा वापर करणार     आहे. 

तिन्ही पक्षांकडून संयुक्त आंदोलनराज्यात १ कोटी ४० लाखांच्या आसपास दूध संकलन होते. सध्या ५० हजार मे टन दूध  भुकटी पडून आहे. दूध   भुकटीच्या निर्यातीसाठी परवानगी देण्यात यावी. दूध भुकटीला १ किलोमागे ५० रुपयांचे अनुदान द्या व दूध उत्पादक शेतकºयाला १ लिटरमागे १० रुपये अनुदान द्या. या मागणीसाठी १ आॅगस्ट रोजी रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम पक्ष आणि रासपच्या वतीने दूधदरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार करणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSadabhau Khotसदाभाउ खोत gram panchayatग्राम पंचायतUddhav Thackerayउद्धव ठाकरेHasan Mushrifहसन मुश्रीफ