शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुक काळात काठी, पेट्रोल अन् रॉकेलसह फिरल्यास पोलीस करणार कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:11 IST

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयाने  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे. ...

ठळक मुद्देसोलापूर शहरात ३० मार्चपर्यंत कोणत्याही व्यक्तीला शस्त्र किंवा झेंड्याची काठी, दगड, पेट्रोल व रॉकेल सोबत बाळगण्यावर निर्बंध आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयाने  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त कार्यालयाने  कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे. सोलापूर शहरात ३० मार्चपर्यंत कोणत्याही व्यक्तीला शस्त्र किंवा झेंड्याची काठी, दगड, पेट्रोल व रॉकेल सोबत बाळगण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या कालावधीत असे प्रकार दिसून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त बापू बांगर यांनी दिली. 

या आदेशानुसार मिरवणुका काढण्यास वा सभा घेण्यास, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.हा आदेश लग्न समारंभ, अंत्ययात्रा, मिरवणुका, मोर्चे, रॅली, आंदोलने, निवेदन, धरणे, सभा इत्यादींना सक्षम पोलीस प्राधिकरणाची परवानगी असल्यास लागू राहणार नाही.

आदेशानुसार शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठ्या किंवा झेंडे असलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरात येईल अशी वस्तू बरोबर नेण्यास बंदी घातली आहे. ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड अगर तत्सम शस्त्रे साठविणे अगर बाळगणे, सार्वजनिक रितीने घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, असभ्य हावभाव करणे, असभ्य भाषा वापरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. निरनिराळ्या जमातीच्या भावना दुखावल्या जातील व भांडणे होतील असे कृत्य, चिथावणीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. 

सरकारी नोकरांना त्यांचे कर्तव्य व अधिकार बजावण्यासाठी वरील वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्यांनी पोलिसाची परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना परवानगीतील अटीस पात्र राहून सदरचे आदेश लागू होणार नाहीत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी