शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर शहरातीतल बेकायदा बांधकामावर दुसºयांदा हातोडा, रेल्वे लाईन येथील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:27 IST

मनपाने शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात उघडलेल्या मोहिमेत पाडकाम करूनही पुन्हा बांधकाम बस्तान बसविणाºयावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. 

ठळक मुद्देदोन दिवसांनंतर या भागाची पुन्हा तपासणी करून कारवाई करण्यात येणारअनधिकृत बांधकामाविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत आतापर्यंत ३४६ मिळकतदारांना नोटिसामनपाने २९ ठिकाणचे बांधकाम पाडले आहे तर ४८ जणांनी स्वत:हून पाडकाम केले

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४  : मनपाने शहरातील बेकायदा बांधकामांविरोधात उघडलेल्या मोहिमेत पाडकाम करूनही पुन्हा बांधकाम बस्तान बसविणाºयावर मंगळवारी कारवाई करण्यात आली. मनपाच्या पथकाने रेल्वे लाईन येथील दंडवते मठाशेजारी असलेल्या प्रीतम शहा यांच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेले बेकायदा बांधकाम मंगळवारी पाडण्यात आले. विशेष म्हणजे यापूर्वीच्या मोहिमेत हे बांधकाम पाडण्यात आले होते. त्यांनी पुन्हा बांधकाम करून पार्किंगच्या जागेत स्टोअर म्हणून वापर सुरू केला होता. त्यांच्याकडे आहार पुरविण्याचा ठेका असल्याने पार्किंगच्या जागेचा वापर या साहित्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसून आल्यावर मनपाच्या पथकातर्फे दुसºयांदा कारवाई करण्यात आली. त्यामुळे त्यांच्याकडून पाडकाम खर्च व दंड वसूल केला जाणार असल्याचे बांधकाम विभागाचे उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. बाळे येथील नंदिनी मल्टिकॉन्स अपार्टमेंटमध्ये बेकायदा बांधकाम करण्यात आल्याची नोटीस यापूर्वीच जागामालक समाने यांना नोटीस बजावली होती. त्यांनी पार्किंगच्या जागेत चक्क ९ गाळे बांधल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गाळ्यांचे पाडकाम करून पार्किंग मोकळे करावे, असे नोटिसीत म्हटले होते. तरीपण त्यांनी दखल न घेतल्याने मंगळवारी सकाळी बांधकाम खात्याचे पथक पाडकामासाठी अपार्टमेंटमध्ये पोहचले. त्यावेळी जागा मालकाने बांधकाम काढण्यासाठी आठ दिवसांची मुदत मागितली. मनपा अधिकाºयांनी त्यांना दोन दिवसांची मुदत दिली आहे. सोमवारी जुळे सोलापुरातील म्हाडा कॉलनीत कारवाई करण्यात आली होती. यात काही जणांनी पाडकाम स्वत:हून काढण्यासाठी मुदत मागून घेतली आहे. दोन दिवसांनंतर या भागाची पुन्हा तपासणी करून कारवाई करण्यात येणार आहे. --------------------------आॅनलाईन प्रतिसाद- अनधिकृत बांधकामाविरुद्ध उघडलेल्या मोहिमेत आतापर्यंत ३४६ मिळकतदारांना नोटिसा दिल्या आहेत. त्यात २९४ व्यावसायिक, ५२ मंगल कार्यालयांचा समावेश आहे. मनपाने २९ ठिकाणचे बांधकाम पाडले आहे तर ४८ जणांनी स्वत:हून पाडकाम केले आहे. मनपाने पाडकाम केलेल्या २६ जणांना १ लाख ९२ हजार पाडकाम खर्च भरण्याची नोटीस दिली आहे. बांधकाम परवाना काढण्यासाठी सुरू केलेल्या आॅनलाईन नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ११५ प्रकरणे दाखल झाली आहेत, अशी माहिती परवाना विभाग प्रमुख उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका