शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर वाळू उत्खनन व चोरीला आळा घालण्यासाठी 'ॲक्शन प्लॅन'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 19:54 IST

विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची माहिती

मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे

 मंगळवेढा तालुक्यात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. बेकायदेशीर वाळू उत्खनन व चोरीला आळा घालण्यासाठी "अॅक्शन प्लॅन' तयार करण्यात आला असून,  वाळू तस्करीचा बिमोड करण्यासाठी महसूल, पोलीस व आरटीओ विभाग  एकत्रित प्रयत्न करण्याचे आदेश कोल्हापूर विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी दिले.   मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिलेल्या भेटी दरम्यान पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिरसी-गोणेवाडी  दरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाने  कारवाईच्या भीतीपोटी पोलीस शिपाई असणारे  गणेश सोलनकर यांना धडक देऊन ठार मारल्याच्या घटनास्थळाला विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी भेट दिली  मंगळवेढा पोलिस ठाण्याच्या आवारात या गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेल्या  अपघातग्रस्त वाहनाची कसून तपासणी करण्यात आली. पोलीस ठाण्यात या गुन्ह्यातील आरोपींकडे कसून चौकशी केली. 

  सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन परिवर्तन मोहिमेने गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याबरोबरच अवैध धंद्यांचं समूळ उच्चाटन होत असून ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविल्याबद्दल पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांचे कौतुक केले. पोलीस प्रशासन समाजाच्या हितासाठी प्रयत्नशील असत्ते. वाळू व्यवसायात तरुण पिढीचा शिरकाव चिंताजनक असून ऑपरेशन परिवर्तन या  धर्तीवर वाळू व्यवसायात येणाऱ्या तरुण पिढीला कसे परावृत्त करता येईल याबाबत  मोहीम राबविण्याची विनंती पोलीस अधीक्षक सातपुते यांना केली. चोऱ्या, दरोडे सारख्या घटनेतील रखडलेले तपास गतीने करून आरोपी जेरबंद करण्याच्या सूचनाही लोहिया यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.   बेकायदेशीर वाळू उपसासाठी कुप्रसिद्ध असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून छापे टाकले जातील. वाळू चोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. वाळू उपशास पाठबळ देणाऱ्या व्यक्तींवर लक्ष केंद्रीत करून महसूल व पोलिसांचे एकत्रित पथके तयार करून संयुक्त कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक  हिम्मतराव जाधव, डीवायएसपी राजश्री पाटील, सांगोला पोलीस निरीक्षक सुहास जगताप आदी उपस्थित होते.

---------------------------------------

कुटुंबातील व्यक्तीला नोकरीत घ्या....

मयत पोलीस गणेश सोलनकर यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीला अनुकंपा तत्वावर तात्काळ नोकरीत सहभागी  करून घ्यावे त्याचबरोबर या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी विमा योजनेसह शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांनी एसपी  तेजस्वी सातपुते व डीवायएसपी राजश्री पाटील यांना दिल्या आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारी