शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील भानुदास तांड्याच्या हातभट्टीवर कारवाई, सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 10:37 IST

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथील भानुदास तांड्यावर धाड टाकून  हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा १ लाख ३0 ...

ठळक मुद्देपथकाने तांड्यावर छापा मारला असता, दोन इसम हातात काठ्या घेऊन बॅरेलमध्ये ढवळताना दिसलेजमिनीत खड्डा मारून १४ बॅरल व त्यात गूळ मिश्रीत रसायन भरलेले होतेखड्ड्यालगत चुलीवर १४ लोखंडी बॅरल असे एकूण २८ बॅरलमध्ये प्रत्येकी २00 लिटर रसायन आढळून आले

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथील भानुदास तांड्यावर धाड टाकून  हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारा १ लाख ३0 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पिंटू काळू चव्हाण, सोमनाथ बाबू चव्हाण (दोघे रा. भानुदास तांडा, दक्षिण सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत हे पथका समवेत मुळेगाव तांडा परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यांना भानुदास तांडा येथे हातभट्टी दारू तयार होत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तांड्यावर छापा मारला असता, दोन इसम हातात काठ्या घेऊन बॅरेलमध्ये ढवळताना दिसले.

पोलिसांना पाहताच दोघे पळून गेले. जमिनीत खड्डा मारून १४ बॅरल व त्यात गूळ मिश्रीत रसायन भरलेले होते. खड्ड्यालगत चुलीवर १४ लोखंडी बॅरल असे एकूण २८ बॅरलमध्ये प्रत्येकी २00 लिटर रसायन आढळून आले. हे सर्व रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सावंत, सहायक फौजदार विवेक सांजेकर, पोलीस हवालदार मल्लिनाथ चडचणकर, सर्जेराव बोबडे, विजयकुमार भरले, पोलीस नाईक निशांत ठोकळे, पोलीस कॉन्स्टेबल आसिफ शेख, अजय वाघमारे, सचिन गायकवाड, अमोल जाधव, दीपक जाधव यांनी पार पाडली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस