शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शेगांव येथील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई,  ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त:, अक्कलकोट तहसील पथकाची कारवाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 12:38 IST

तालुक्यातील शेगाव येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणारी चार वाहने, २४ ब्रास वाळू असा ५५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्देसुलेरजवळगे व काझीकणबसमध्ये अक्कलकोट तहसीलच्या पथकाने कारवाईकारवाईदरम्यान पथकाला चकवा देत दोन वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी

आॅनलाइन लोकमत सोलापूरअक्कलकोट दि २४ : तालुक्यातील शेगाव येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करुन वाहतूक करणारी चार वाहने, २४ ब्रास वाळू असा ५५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २१ जानेवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.शेगावजवळील भीमा नदीपात्रातून एम. एच. २५/ एफ. ३0, एम. एच. २५/ एफ. ४१, एम. एच. 25/ ए. फ. ११११, एम. एच. २५ / यू. २१५७ या प्रत्येक वाहनामध्ये सहा ब्रास वाळू अवैधपणे वाहतूक करीत असताना सुलेरजवळगे व काझीकणबसमध्ये अक्कलकोट तहसीलच्या पथकाने कारवाई केली. १८ ब्रास वाळूची किंमत १ लाख २६ हजार, तर डंपरची ५४ लाख असा एकूण ५५ लाख २६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई करजगी मंडळाचे मंडल अधिकारी जे. जु. जुजगार यांच्या नेतृत्वाखाली गावकामगार तलाठी शिवू कोळी, बी. पी. कुंभार, प्रदीप जाधव, नुरुद्दीन मुजावर यांच्यासह पोलीस पाटील श्रीकांत पाटील (हिळ्ळी), खाजप्पा शिवशरण (कुडल), रवींद्र शिर्के (देविकवठे), तुकाराम कामाठी (आंदेवाडी), कोतवाल प्रवीण गुंजले (हिळ्ळी), काशिनाथ माने (शावळ), बंदेनवाज दफेदार (मंगरुळ), विठ्ठल गुरव (घुंगरेगाव) यांनी केली. --------------------दोन वाहनचालक पळून गेलेया वाहनांवरील चालक अर्जुन सुरेश मंजुळे, विजय सदाशिव राठोड यांच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम दक्षिण पोलीस ठाण्यात चालू होते. ही वाहने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आवारात लावण्यात आली आहेत. कारवाईदरम्यान पथकाला चकवा देत दोन वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी झाले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय