शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

रस्ता अपना, कायको डरना? नाय चालणार; सोलापुरात १,९२१ नियमतोडूंवर ॲक्शन

By विलास जळकोटकर | Updated: March 26, 2023 19:02 IST

सोलापुरात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या १,९२१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

सोलापूर: सोलापुरातील वाहतुकीच्या शिस्तीला लगाम घालण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पथक ॲक्शन मोडवर उतरले आहे. ‘रस्ता अपना, कायको डरना? नही चलेगा’ असा कानमंत्र देत १ मार्च ते २३ मार्च या काळात १,९२१ जणांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला असून, बेकसूर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

या कारवाईमध्ये लायसन परवाना नसणे, अवैध प्रवासी वाहतूक, योग्यता प्रमाणपत्र नसणे, पीयूसी प्रमाणपत्र नसणे अशा अनेक नियमांचा भंग करणाऱ्यांवर ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही मोहीम तीन वायुवेग पथकामार्फत राबवण्यात येत आहे.

दुचाकी अपघाताचे प्रमाण वाढलेरस्ता सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवण्याची नागरिकांची मानसिकता झाली आहे. अपघाताची संख्या पाहता मोठ्या प्रमाणात अपघात दुचाकीचे असल्याचे आढळून आले आहे. तसेच ओव्हरस्पीडमुळेही जास्त अपघात होत आहेत. फेब्रुवारी २२ च्या तुलनेत तालुक्याच्या ठिकाणी जास्त अपघात होत आहेत. बार्शी व सोलापूर (उत्तर) तसेच सोलापूर (दक्षिण) या तालुक्यावर लक्ष केंद्रित करून कारवाई करण्यात आली होती. त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आल्याचे आरटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

...अशी झाली कारवाई१ मार्च ते २३ मार्चपर्यंत या कालावधीत तीन वायुवेग पथकामार्फत नियमाचा भंग करणाऱ्या १,९२१ जणांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये विना लायसन्स - ९०७, योग्यता प्रमाणपत्र नसणे - ३५७, पी.यू.सी. नाही - २२४, बेकायदेशीर प्रवासी वाहतूक - १२, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवासी बस तपासणी - तीन, विना हेल्मेट - ६७९, विना सीटबेल्ट - २१७, मोबाइलवर बोलणे - ५६, विमा नसलेली वाहने - ४९४, ओव्हरलोड - १८, रिफ्लेक्टर नाही - १५७, स्पीड गन केसेस - २९९अशा प्रकारची कारवाई करण्यात आली. ही मोहीम यापुढेही चालू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका