शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांवरील कारवाईमुळे पुढच्या वर्षी होणार बियाणांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 11:59 IST

कंपन्यांवरील कारवाईचा परिणाम; कृषी विभागाने शेतकºयांमध्ये सुरू केली जनजागृती

ठळक मुद्देसध्या उडीद, मुगाची काढणी सुरू आहे तर सोयाबीन शेंगावर आणि बाजरीत दाणा भरू लागला पाऊस सुरूच असल्याने शेतकरी उडीद व मुगाचे नुकसान टाळण्यासाठी घाईने मळणी उरकत आहेज्या प्लॉटमधील बियाणे राखून ठेवायचे आहे त्या प्लॉटमधील भेसळ बियाणांचा शोध शेतकºयांनी घ्यावा

सोलापूर : सोयाबीन, उडीद, बाजरी बियाणांच्या उगवणी न झाल्याच्या शेतकºयांच्या तक्रारीमुळे कृषी विभागाने विविध कंपन्यांवर गुन्हे व खटले दाखल केल्यामुळे कंपन्यांनी यावर्षीच्या हंगामात बियाणांचे प्लॉट तयार केले नाहीत. त्यामुळे पुढील वर्षीच्या हंगामात बाजारात बियाणांची प्रचंड टंचाई जाणवणार या भीतीने कृषी विभागाने शेतावर जाऊन शेतकºयांना बियाणांची साठवण करण्याबाबत मोहीम सुरू केली आहे.

गतवर्षी सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात राज्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन, उडीद, बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशात यंदा विविध नामवंत कंपन्यांनी बाजारात आणलेल्या उडीद व सोयाबीनच्या बियाणांची उगवण झाली नसल्याच्या शेतकºयांनी तक्रारी केल्या. कृषिमंत्री दादा भुसे यांनी निकृष्ट बियाणांची समिती नियुक्त करून चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत बियाणांमध्ये दोष आढळल्याने विविध कंपन्यांवर खटले व थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही कंपन्यांनी शेतकºयांना भरपाई देऊन आपली कायद्याच्या कचाट्यातून सुटका करून घेतली. मात्र या कारवाई सत्रामुळे अनेक कंपन्यांनी यंदा बियाणे निर्मितीचे प्लॉट धरलेच नसल्याचे दिसून आले आहे. ही बाब निदर्शनाला येताच कृषी विभाग सतर्क झाला आहे.

सध्या उडीद, मुगाची काढणी सुरू आहे तर सोयाबीन शेंगावर आणि बाजरीत दाणा भरू लागला आहे. पाऊस सुरूच असल्याने शेतकरी उडीद व मुगाचे नुकसान टाळण्यासाठी घाईने मळणी उरकत आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना पुढील वर्षाच्या संकटाची जाणीव करून देण्यासाठी कृषी कर्मचारी शेताशेतावर फिरताना दिसत आहेत. पुढील वर्षी बाजारात पिशव्यांतून पुरेसे बियाणे मिळणार नाही. आपल्या शेतात उगवण झालेल्या चांगल्या प्लॉटचे बियाणे बाजूला काढून साठवून ठेवा, असे सांगितले जात आहे.

बियाणे कंपन्यांवर खटले भरल्याने यंदा या कंपन्यांनी बियाणांचे प्लॉट केले नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील वर्षी बियाणांची टंचाई जाणवू शकणार आहे. त्यामुळे कृषी विभागाने वेळीच शेतकºयांना सावध करून बियाणे साठवणुकीबाबत मार्गदर्शन सुरू केले आहे.

    -रवींद्र माने,     जिल्हा कृषी अधिकारी

अशी करा पिकांची निवडज्या प्लॉटमधील बियाणे राखून ठेवायचे आहे त्या प्लॉटमधील भेसळ बियाणांचा शोध शेतकºयांनी घ्यावा. शेंगाला कीड असलेली रोपे काढून टाकावीत. शेंगावर आंतरप्रवाही बुरशी नाशकाची फवारणी करावी. पावसात भिजलेले पीक साठविण्यासाठी घेऊ नये. दाणे उन्हात पसरवून वाळवून घ्यावेत. पोत्यात हे दाणे भरावेत. थप्पी ७ पोत्यांपेक्षा जास्त असू नये. कोरड्या जागेत साठवणूक करावी वाहतूक करताना पोती फेकू नयेत. साठवलेले हे बी तीन वेळा कुंडीत किंवा एका वाफ्यात लावून उगवणीची चाचणी घ्यावी.

असे आहे पेरणी क्षेत्रयंदा खरीप हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यात ३ लाख ५९ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. चांगल्या पावसामुळे सरासरीच्या १५३ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, बाजरी व तुरीच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा वाढ झाली आहे.

मशीनमधील बियाणे नकोसध्या बाजारात ट्रॅक्टरवर वेगाने मळणी करणारी यंत्रे आली आहेत. उडदाच्या राशीसाठी या मशीनचा वापर केला जात आहे. ५०० पुढील आरपीएम (फिरण्याचा मिनिटाचा वेग) असलेल्या मळणी मशीनवर केलेले बियाणे उगवणीला मारक ठरू शकते. त्यामुळे मशीनऐवजी बियाणांपुरते पीक शेतकºयांनी लाकडाने बडवून वेगळे करून ठेवावे, असे मार्गदर्शन केले जात आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी