शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात ९१ हजार वाहनांवर कारवाई; तरीही सोलापूर शहरातील वाहतुकीला शिस्त लागेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 14:30 IST

पार्किंगला जागाच नसल्याने भले तरी दंड देऊ पण जागा मिळेल तेथे गाड्या लावू ही सवय सोलापूरकरांच्या अंगवळणी पडल्याने सोलापूर शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात कारवाई केलेल्या वाहनांची संख्या लाखाकडे चालली असून सुमारे तीन कोटींचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देपार्किगच्या समस्येकडे मनपा अथवा पोलीस कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे  चित्र सोलापुरात पहावयास मिळत आहेबेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून २ कोटी ८१ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूलशहर वाहतूक शाखेचा कारवाईबाबत हा विक्रमच

अमित सोमवंशी  आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १०  : पार्किंगला जागाच नसल्याने भले तरी दंड देऊ पण जागा मिळेल तेथे गाड्या लावू ही सवय सोलापूरकरांच्या अंगवळणी पडल्याने सोलापूर शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात कारवाई केलेल्या वाहनांची संख्या लाखाकडे चालली असून सुमारे तीन कोटींचा दंड वसूल केला आहे. तथापि पार्किगच्या समस्येकडे मनपा अथवा पोलीस कोणीच गांभीर्याने घेत नसल्याचे  चित्र सोलापुरात पहावयास मिळत आहे. गेल्या बारा महिन्यात  बेशिस्त दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांवर कारवाई करून २ कोटी ८१ लाख ७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले. शहर वाहतूक शाखेचा कारवाईबाबत हा विक्रमच असून, इतक्या मोठ्या प्रमाणावर  दंड वसूल झालेला आहे. यात सर्वाधिक वाटा नो पार्किंगमध्ये वाहनांचाआहे हे विशेष.शहरात दुचाकी, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, चारचाकी वाहनधारकांनी सीटबेल्ट न लावणे, कागदपत्रांची पूर्तता नसणे आदी नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली. मुख्य चौक तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहन पार्किंग करणाºयांची वाहनेदेखील वाहतूक शाखेच्या गाडीत नेत त्यांच्यावरदेखील दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांनी अनेकदा समज देऊनही बेशिस्त वाहनचालकांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याचे दिसून येते.पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे  यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव, दक्षिण विभागाचे पोलीस निरीक्षक एस. एस. काने वेगवेगळे उपक्रम राबवून वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे; मात्र या आवाहनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. अवैध प्रवासी वाहतूक, ट्रिपल सीट, रहदारीस अडथळा, मद्य सेवन करून वाहन चालविणे, फॅन्सी नंबरप्लेट, भरधाव वाहन चालविणे, रस्त्यावर हातगाडी, चारचाकी वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणे आदी कारणांवरून कारवाई करण्यात आली आहे़ वाहन चालविताना मोबाईलवर बोलणाºया ६ हजार ३७८ जणांवर वाहतूक शाखेने कारवाई करुन लाखो रुपयांचा दंड वसूल केला. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसTrafficवाहतूक कोंडी