शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शाळेच्या पहिल्याच दिवशी ११ स्कूलबसवर झाली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 13:22 IST

सोलापूर उपप्रादेशिक परिवहन विभागाची मोहिम; मुले शाळेला सोडून बसचा घेतला ताबा

ठळक मुद्दे७0 बसची तपासणी करण्यात आली, यात दोषी आढळलेल्या ११ बसवर कारवाईउपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि जिल्हा अशा दोन पथकामार्फत अचानकपणे स्कूल बसची तपासणी करण्यात आलीसहा बसचालकांवर जागेवर दंड करून सोडून देण्यात आले तर ११ बस विविध ठिकाणी अडवून ठेवण्यात आल्या

सोलापूर : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्याची घाई झालेली असताना आरटीओच्या गाडीमुळे बसला ब्रेक लागला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी आरटीओने उघडलेल्या मोहिमेत सोमवारी ७0 बसची तपासणी करण्यात आली, यात दोषी आढळलेल्या ११ बसवर कारवाई करण्यात आली. 

आरटीओ कार्यालयाने गेल्या महिन्यात स्कूलबस तपासणी मोहीम राबविली होती. यात शाळांकडे असलेल्या बस नियमाप्रमाणे आहेत की नाहीत याची तपासणी करून प्रमाणपत्र देण्यात आले होते. तरीही अनेक चालकांनी बस तपासणी केलेली नव्हती. त्यामुळे परिवहन विभागाने शालेय समितीकडे बसच्या तपासणीबाबत कळविले होते. शाळेच्या पहिल्या दिवशी अघटीत घटना घडू नये यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि जिल्हा अशा दोन पथकामार्फत अचानकपणे स्कूल बसची तपासणी करण्यात आली. शाळेकडे जाणाºया ७0 बस अडवून तपासणी केल्यावर १७ बस दोषी आढळल्या. सहा बसचालकांवर जागेवर दंड करून सोडून देण्यात आले तर ११ बस विविध ठिकाणी अडवून ठेवण्यात आल्या. 

शहरासाठी मोटार वाहन निरीक्षक यु. बी. राठोड, एस. डी. खाडे, जे. एम. मोरे, व्ही. आर. चौधरी, आशिश पराशर, एस. पी. पाटील, ए. बी. खेनट, सहायक एस. एस. चव्हाण, एम. टी. हजारे, एस. बी. पाटील. पी. एल. यादव यांच्या पथकाने ठिकठिकाणी थांबून बसची तपासणी केली. भरारी पथकाचे मोटार वाहन निरीक्षक ए. डी. गुरव, अजित ताम्हणकर, सहायक  एन. बी. शिंदे, एन. आर. जगदाळे, एस. एन. डुकरे, एस. एस. ठोंबरे, ए. एम. भागवत, विजय लोखंडे, प्रशांत भांगे यांच्या पथकाने पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, मंद्रुप, बार्शी, अक्कलकोट येथे तपासणी केली. 

स्कूलबससाठीही सुरक्षा आवश्यक- स्कूलबस नियमानुसार आहे की नाही याची आरटीओच्या पथकाने तपासणी केली. कागदपत्रांमध्ये बसचे फिटनेस, विमा, चालकाचा वाहन परवाना, स्कुल बसची नियमावली: बसचा रंग पिवळा आहे की नाही, बसमध्ये विद्यार्थी सुरक्षेसाठी सहायक आहे काय, परमीट भरलेले आहे काय, बसच्या पायरीची उंची, बाहेर पडण्याचा मार्ग, सेफ्टी बार, रिफ्लेक्टर, प्रथमोपचार पेटी, आग प्रतिबंधक यंत्राची व्यवस्था या बाबी तपासण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डोळे यांनी सांगितले. स्कूलबस व रिक्षातून होणारी वाहतूक तपासण्यात आली. अचानकपणे अशी मोहीम सुरू राहणार आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसSchoolशाळाEducationशिक्षण