यामध्ये नागनाथ सुनील कोडग (वय २०,रा.माळेगाव ता.माढा), सोमनाथ हणुमंत शिंदे (वय-२२), तेजेस नागेश पवार (वय २२, दोघे रा.बेंबळे ता.माढा) अशी आरोपींची नावे आहेत. ही लुटमारीची घटना दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथे घडली होती. तिन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत सुरज वाघमारे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दिवसाढवळ्या झालेल्या लुटमारीच्या घटनेने पोलीसही हादरून गेले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी पोलीस उपनिरीक्षक पी.व्ही काशीद यांच्या नेतृत्वाखाली बाळराजे घाडगे, तुकाराम माने-देशमुख यांची तपासासाठी नेमणूक केली. या पथकाने गुप्त माहितीच्या व तांत्रिक माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या दोन-तीन तासांत तिघांनाही बेड्या ठोकल्या. त्यांची अंगझडती घेतली. तेव्हा तीन मोबाइल हाती लागले. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तीन तासांत आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST