आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : कलबुर्गी (राज्य कर्नाटक) येथे झालेल्या क्रुझर जीप व टँकरच्या भीषण अपघातात वैराग (ता़ बार्शी) येथील पाच जण जागीच ठार तर अन्य सहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली़पहिल्या घटना अशी की, कर्नाटक हद्दीतील कलबुर्गी-हुमनाबाद महामार्गावर क्रुझर व टँकरची समोरासमोर धडक झाली़ या धडकेत वैराग (ता़ बार्शी, जि़ सोलापूर ) येथील पाच जण जागीच ठार तर सहा जण जखमी झाले़ वैराग येथील कुटुंब लग्न समारंभासाठी कलबुर्गी येथे जात असताना घडली घटना़ जखमींवर कलबुर्गी येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ या अपघातानंतर महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती़ अपघातानंतर कलबुर्गी पोलीसांनी लागलीच घटनास्थळाला भेट देऊन जखमींना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली़ या घटनेनंतर वैरागवर शोककळ पसरली आहे़
कर्नाटकातील कलबुर्गीजवळ अपघात, सोलापूर जिल्ह्यातील पाच जण जागीच ठार, सहा जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 15:42 IST
कलबुर्गी (राज्य कर्नाटक) येथे झालेल्या क्रुझर जीप व टँकरच्या भीषण अपघातात वैराग (ता़ बार्शी) येथील पाच जण जागीच ठार तर अन्य सहा जण जखमी झाल्याची घटना मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली़
कर्नाटकातील कलबुर्गीजवळ अपघात, सोलापूर जिल्ह्यातील पाच जण जागीच ठार, सहा जण जखमी
ठळक मुद्देविवाह समारंभासाठी गेले होते कुटुंबकलबुर्गी - हुमनाबाद महामार्गावरील वाहतुक खोळंबलीअपघातानंतर कर्नाटक पोलीस घटनास्थळी दाखल