शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या निमित्तानं बालकेवर अत्याचार; आरोपी मजुरास २५ वर्षे सक्तमजुरी

By विलास जळकोटकर | Updated: January 4, 2024 19:15 IST

खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाकडून ४ साक्षीदार तपासण्यात आले.

सोलापूर : बांधकामावर मजूर म्हणून काम करणाऱ्या तरुणानं सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी खटल्याची सुनावणी गुरुवारी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली. या खटल्यात न्यायालयापुढे सादर झालेल्या साक्षी, वैद्यकीय अहवाल, वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायाधीशांनी सुनील सिद्राम म्हेत्रे (वय- २२, बापूजी नगर, सोलापूर) यास २५ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, या खटल्यातील आरोपी सुनील हा फिर्यादीच्या घराच्या बांधकामाचे ठेकेदाराकडे मजूर म्हणून कामास होता. घटनेदिवशी ४ जानेवारी २०२० रोजी पिडित सात वर्षाच्या बालिकेची आई घरामध्ये झोपलेली होती. आरोपीने पीडित बालिकेला पिण्यासाठी पाण मागितले. ती पाणी देण्यासाठी गेली असता आरोपीने तिला ‘तुला मोर दाखवतो’ असे म्हणून आत खोलीत जाऊन तिच्याशी लैंगिक अत्याचार केला. 

सदरची बाब पीडितेने तिच्या आईला सांगितली असता फिर्यादीने आरोपीला जाब विचारण्यासाठी गेली. तोपर्यंत आरोपी पळून गेला. त्यानंतर फिर्यादीने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या गुन्ह्याचा तपास करुन तत्कालिन सपोनि तपासी अधिकारी एन. पी. साळुंखे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांच्या न्यायालयात झाली. सरकारी वकिलांनी सदर आरोपीने अत्याचार केला असून, घटनास्थळावरुन आरोपी लगेच पळून गेला. लागलीच फिर्यादही देण्यात आली. वैद्यकीय अहवालानुसार सदर गुन्हा आरोपीने केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. या खटल्यात सरकार पक्षाच्या वतीने ॲड. प्रकाश जन्नू आरोपीतर्फे ॲड. फिरोज शेख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलीस हवालदार प्यारन नदाफ यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तीवादसरकारी वकील प्रकाश जन्नू यांनी युक्तीवाद मांडताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पिडितेवर अत्याचार झाल्याचा अहवाल दिला आहे. आरोपीने अमानुष कृत्य केले आहे. साक्षीपुराव्याच्या आधारे सिद्ध केल्याचे नमूद केले. हा युक्तीवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस २५ वर्षाची शिक्षा सुनावली. चार साक्षीदार तपासले खटल्याच्या सुनावणीत सरकार पक्षाकडून ४ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी (पिडितेची आई), पिडिता, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अशी सुनावली शिक्षान्यायालयाने आरोपीला दोषी धरुन भा. द. वि. कलम ३७६ (२) (आय), ३७६ ब (जे), ३५४ - अ तसेच बाललैंगिक अत्याचार कलम ४,८ अन्वये दोषी धरुन बाललैंगिक अत्याचार कलम ५ (एम) व ६ अन्वये २५ वर्षाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयsexual harassmentलैंगिक छळ