शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपूरातील आषाढी एकादशीवर मराठा आंदोलनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 14:57 IST

लाखो भाविक पंढरपूरात ; धनगर, कोळी, वारकरी संघटनाही आक्रमक, पोलिसांवर ताण

ठळक मुद्देमराठा समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांसाठी सरकार कटिबद्ध - महसूलमंत्रीपोलीस, वारकरी व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांमध्ये तणावाचे वातावरण - महसूलमंत्री

पंढरपूर : आषाढी एकादशीला श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी पंढरपुरात येत आहेत. मात्र, मराठा क्रांती मोर्चा, धनगर समाज अशा  विविध संघटनांच्या आक्रमक पवित्र्यामुळे वारीवर आंदोलनाचे सावट आहे. सरकारच्या मेगाभरतीत १६ टक्के जागा मराठा समाजासाठी राखून ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले असले तरी तशी अधिसूचना काढण्याची मागणी मराठा  मोर्चाने  केली आहे. 

आषाढी एकादशी सोमवारी असून, श्रीसंत तुकाराम, श्रीसंत ज्ञानेश्वर या प्रमुख संतांच्या पालख्यांसह शेकडो दिंड्या व १० लाखांपेक्षा जास्त भाविकांचे पंढरपुरात आगमन होत आहे. मराठा मोर्चाने मुख्यमंत्र्यांनी अगोदर अधिसूचना काढूनच महापूजेसाठी यावे, असा पवित्रा घेतला आहे. धनगर समाज आरक्षणासाठी आग्रही आहे. कोळी समाजाने महादेव कोळी असा दाखला मिळाण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विविध वारकरी संघटनांनी मंदिर समितीविरोधात पवित्रा घेतला आहे.

यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. वारकºयांची सुरक्षा व आंदोलकांचा बंदोबस्त ठेवण्यासाठी त्यांना सतर्क राहावे लागणार आहे. त्यामुळे एकूणच पोलीस प्रशासनावर मोठा ताण आला आहे. आंदोलकांनी राज्यासह पंढरपुरातही काही ठिकाणी बस तोडफोड, पुतळ्याचे दहन करणे, चक्काजाम, ठिय्या आंदोलन असा पवित्रा घेतल्याने तणाव आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एसआरपीच्या तुकड्यांसह जादा पोलीस बंदोबस्त मागविला आहे.

६५ एकर परिसरात हरिनामाचा गजरपंढरपूर : चंद्रभागा नदीच्या काठावरील ६५ एकर परिसऱ़़ ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात दिंड्यांचे आगमऩ़़ नोंदणी केलेल्या प्लॉटवर विसावा़़़ दिंडीतील काही वारकºयांची लागलीच राहुटी उभारण्याची लगबग़़़  ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘हरिनामाचा’ गजर सुरू केल्याचे चित्र शनिवारी पाहावयास मिळाले़.

चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन!भंडीशेगाव : आळंदी ते पंढरपूर या प्रवासात विठुरायाच्या पंढरीत प्रवेश करण्यासाठी अवघा एक दिवस आणि सहा किलोमीटरचे अंतर उरले आहे. दर्शनाची आस पूर्ण होण्यासाठी आता अवघा काही तासांचाच अवधी उरला आहे.

मराठा समाजाच्या बहुतांश मागण्या पूर्ण केल्या असून उर्वरित मागण्यांसाठी सरकार कटिबद्ध आहे. मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी विरोध करणे उचित नाही.     - चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री

पोलीस, वारकरी व मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाºयांमध्ये तणावाचे वातावरण आहे़ आषाढीत भाविकांना त्रास न देता सुरळीत पार पाडायची असेल, तर मुख्यमंत्र्यांनी महापूजेचा हट्ट सोडावा व आपला दौरा रद्द करावा.  

 - आ़ भारत भालके, काँग्रेस

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर