शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम आरक्षणासाठी ८५ हजार सह्यांचे निवेदन, सोलापूरचे आडम मास्तर राज्यपालांना भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 10:59 IST

आडम राज्यपालांना भेटले : पाच टक्के राखीव जागांची मागणी

ठळक मुद्दे८५ हजार स्वाक्षºयांचे निवेदन देऊन चर्चा आंदोलनांच्या माध्यमातून राज्यात पडसाद महाराष्ट्रातही ५ टक्के आरक्षण देण्याची आग्रही मागणी

सोलापूर : राज्यातील मुस्लीम अल्पसंख्याकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे, या मागणीसाठी माकपाचे राज्य सचिव माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक हक्क संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक अ‍ॅड. एम.एच.शेख, जिल्हा निमंत्रक युसूफ शेख (मेजर) या शिष्टमंडळाद्वारे राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेतली. यावेळी त्यांना ८५ हजार स्वाक्षºयांचे निवेदन देऊन चर्चा केली. 

राज्यपालांसमोर मांडणी करताना आडम मास्तर म्हणाले, महाराष्ट्र शासनाने १९ जुलै २०१४ रोजी मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षणासाठी अधिसूचना काढली. परंतु उच्च न्यायालयाने ही अधिसूचना फेटाळून लावत अंशकालीन ५ टक्के शैक्षणिक आरक्षण लागू ठेवावे, असा निर्णय दिला. परंतु या अधिसूचनेचे रुपांतर कायद्यात झाले नाही. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना नाईलाजाने शैक्षणिक संस्थांमध्ये लाखो रुपयांची फी भरून प्रलंबित निकाल घ्यावे लागले.

सध्या राज्यात मराठा व धनगर समाजाला आरक्षणाची मागणी जोर धरत आहे. आंदोलनांच्या माध्यमातून राज्यात पडसाद उमटत आहेत. मराठा व धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असताना मुस्लीम अल्पसंख्याक समाजालादेखील ५ टक्के आरक्षण देऊन न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आंध्रप्रदेश आणि तेलंगणात मुस्लीम अल्पसंख्याकांना १० टक्के आरक्षण मिळत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही ५ टक्के आरक्षण देण्याची आग्रही मागणी त्यांनी केली.यावेळी राज्यपालांनी मुस्लीम अल्पसंख्याकांना शिक्षण व नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यास राज्य शासनाला सूचना करणार असल्याची ग्वाही दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरMuslimमुस्लीम