आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : सोलापूर महानगरपालिकेत सभागृहनेते सुरेश पाटील आजारी असल्याने प्रभारी सभागृहनेता म्हणून आजच्या सभेपुरते नागेश वल्याळ यांची नियुक्ती करून महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या मदतीने ९ मिनिटात २१ विषय मंजूर केले़ बोलण्याची संधी न दिल्यामुळे काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी संतापून महापौरच्या डायसच्या दिशेने फाईली फेकून घोषणाबाजी केली़ शिवसेनेने एमआयएम, काँग्रेस आणि बसपा यांना गाफील ठेवून भाजपाशी हातमिळवणी करून ९ झोन कार्यालयास मंजूरी दिली़ त्यात स्वत:च्या पारड्यात दोन, एमआयएमला एक तर भाजपाला सहा जागा दिल्या़ या सभेला पालकमंत्री गटाचे ३५ सदस्य गैरहजर होते़ तरीही भाजपाचे शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी यांनी आजच्या सभेपुरते प्रभारी सभागृहनेते म्हणून नागेश वल्याळ यांना काम करण्यास परवानगी दिली़ तोपर्यंत महापौर शोभा बनशेट्टी यांनी स्वत:च्या अधिकाºयांत नागेश वल्याळ यांनी नियुक्ती करून सभागृहाचे कामकाज चालविले़ गोंधळात राजकुमार हंचाटे यांनी उपसुचनेचे वाचन केले़ ९ मिनिटांत २१ विषय महापालिकेच्या सभागृहात मंजूर केले़ यात झोन समिती, हद्दवाढ ड्रेनेज योजना, गुंठेवारी प्रकरण, परिवहन समितीकडून आलेल्या महत्वाच्या विषयांचा समावेश आहे़ विरोधकांनी या विषयावर बोलण्यास संधी द्यावी अशी मागणी केली, ती फेटाळत महापौर शोभा बनशेट्टी यांनी खटलावरील सर्व विषय संपल्याने सभा तहकूब केल्याचे घोषित केले़ सत्ताधाºयांनी ९ झोन कार्यालये मंजूर केलेला विषय बेकायदेशीर असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, बसपाचे आनंद चंदनशिवे यांनी केला़ या नव्या झोन कार्यालय मंजूरीसाठी सभागृहाला विश्वासात घेतले नाही, त्यामुळे हा विषय मंजूर करू नये असे निवेदन मनपा आयुक्त डॉ़ अविनाश ढाकणे यांना दिले़ सभेला उपमहापौर शशिकला बत्तुल यांच्यासह पालकमंत्री गटाचे सदस्य, विरोधी पक्षनेते महेश कोठे, देवेंद्र कोठे, लक्ष्मण जाधव आदी गैरहजर होते़
अबब़़...... ९ मिनिटात २१ विषयांना सभागृहात मिळाली मंजूरी, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार, शिवसेनेच्या साथीने सहकारमंत्र्याच्या गटाने केली पालकमंत्री गटावर मात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 13:28 IST
महापौर शोभा बनशेट्टी यांनी शिवसेनेच्या मदतीने ९ मिनिटात २१ विषय मंजूर केले़ बोलण्याची संधी न दिल्यामुळे काँग्रेस व बसपाच्या सदस्यांनी संतापून महापौरच्या डायसच्या दिशेने फाईली फेकून घोषणाबाजी केली़
अबब़़...... ९ मिनिटात २१ विषयांना सभागृहात मिळाली मंजूरी, सोलापूर महानगरपालिकेतील प्रकार, शिवसेनेच्या साथीने सहकारमंत्र्याच्या गटाने केली पालकमंत्री गटावर मात !
ठळक मुद्देशिवसेनेने एमआयएम, काँग्रेस आणि बसपा यांना गाफील ठेवून भाजपाशी हातमिळवणी करून ९ झोन कार्यालयास मंजूरी दिली़या सभेला पालकमंत्री गटाचे ३५ सदस्य गैरहजर होते़सभागृहनेते सुरेश पाटील आजारी असल्याने प्रभारी सभागृहनेता म्हणून आजच्या सभेपुरते नागेश वल्याळ यांची नियुक्ती