शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अबब...सोलापूरात पाईपलाईनमध्ये काय निघाले ते पहा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:09 IST

विडी घरकूलमधील घटना: जीपने ओढले तरी उपयोग झाला नाही

ठळक मुद्देचक्क १९ फुट वडाच्या पारंब्या महापालिकेच्या अधिकाºयांनी बाहेर काढल्यावडाच्या झाडाच्या मुळ्या पाईपलाइन मध्ये घुसल्यावडाच्या पारंब्या बाहेर ओढून काढण्यासाठी जीप गाडीचा वापर

सोलापूर : सोलापूर शहरातील विडी घरकुल येथील पिण्याच्या पाईपलाईनमधून चक्क १९ फुट वडाच्या पारंब्या महापालिकेच्या अधिकाºयांनी बाहेर काढल्या आहेत़ या परिसरातील नळाला पाणी का येत नाही याची तपासणी केल्यावर पाईपलाइन शेजारी ३५ फुटावर असलेल्या वडाच्या झाडाच्या मुळ्या पाईपलाइन मध्ये घुसल्याचे दिसून आले आहे़ २० वर्षापुर्वीची ही पाईपलाइन असून आतमध्ये वाढलेल्या वडाच्या पारंब्या बाहेर ओढून काढण्यासाठी जीप गाडीचा वापर करण्यात आला

प्रभाग १0 ब च्या नगरसेविका सावित्रा सामल (रा. बी ग्रुप, विडी घरकूल) यांच्या घरामागील काही लोकांना बºयाच दिवसांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत होते. तक्रारी करूनही महापालिकेच्या अधिकाºयांनी दखल घेतली नव्हती. अलीकडे तर अर्धा तासाला घागरभर पाणी मिळू लागल्याने नागरिक हैराण झाले. 

समोरील घरांना भरपूर पाणी पण शेवटच्या चार-पाच घरांना थेंब थेंब पाणी येत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी विभागीय अधिकारी मठपती यांची भेट घेऊन तक्रार केली. त्यावर मठपती यांनी जलवाहिनी तपासण्यासाठी मजूर पाठविले. मजुरांनी संबंधिताच्या घराजवळची जलवाहिनी तपासली. त्यावेळी शेवटच्या काही भागात जलवाहिनीत पाणी येत नसल्याचे आढळले. जलवाहिनीत काहीतरी अडकल्याचा अंदाज मजुरांनी केला.  जलवाहिनी फोडून नुकसान करण्यापेक्षा शेवटची कॅप उघडण्याची मठपती यांनी मजुरांना सूचना केली. कॅप उघडल्यावर त्यांना आत मुळ्या भरल्याचे दिसून आले. बाजूला ३५ फुटांवर असलेल्या वडाची झाडाची मुळी कॅपमधून जलवाहिनीत शिरली होती. या मुळीने आता जाळे निर्माण केले होते. तारेने टोकरून जाळे काढण्याचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. शेवटी आत तार घुसवून जीपने ओढण्यात आले. रॉड घालून परिसरातील लोकांनी एकजूट करून ओढले. त्यावेळी १९ फुटाच्या वडाच्या पारंब्या बाहेर निघाल्या. विडी घरकूल आणि पूर्व भागात दिवसभर या घटनेची चर्चा होती.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाWaterपाणी