शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अबब... कपिला गायीच्या दुधाचे तूप चक्क ७ हजार रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:27 IST

कपिला गायीचे दूध  आणि दुधापासून बनविलेले तूप, गोमूत्र, शेण हे खूपच औषधी गुणधर्माचे आहेत. अनेक रोग समूळ नष्ट करते़ त्यामुळे या गायीचे तूप तब्बल ७ हजार रुपये किलोने विकले जाते.

ठळक मुद्देपंढरपुरातील प्रमुख कार्तिक, माघी आणि चैत्री वारीला वाखरी येथे जनावरांचा बाजार भरतो़ यंदा दुष्काळी परिस्थिती, बाजारातील मंदी किंवा निवडणुकांचा माहोल या कारणामुळे जनावरांच्या बाजारात शुकशुकाट जनावरांसाठी बाजार समितीने वाखरी तळावर पाणी, वीज यांसह मूलभूत गरजा उपलब्ध करून दिल्या होत्या. 

प्रभू पुजारी 

पंढरपूर : दिसायला देखणी... उंचीने कमीच... रंगाने सर्वांग काळी... अशी ही कपिला गाय़ पण या गायीचे तूप चक्क ७ हजार रुपये किलो असून, त्यात औषधी गुणधर्म असल्याने डॉक्टरांकडूनच सर्वाधिक मागणी असते, असे पशुपालक तुकाराम शिवाजी शेंबडे (रा़ इसबावी) यांनी सांगितले.

पंढरपुरातील प्रमुख कार्तिक, माघी आणि चैत्री वारीला वाखरी येथे जनावरांचा बाजार भरतो़ यंदा दुष्काळी परिस्थिती, बाजारातील मंदी किंवा निवडणुकांचा माहोल या कारणामुळे जनावरांच्या बाजारात शुकशुकाट दिसून आला़ कोणता तरी आठवडी बाजार भरल्यासारखी स्थिती चैत्री वारीच्या जनावरांच्या बाजारात दिसून आली़ मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत केवळ २५० जनावरांची नोंदणी झाली होती़ काही जनावरे येत होती, यावरून ३०० पर्यंत आकडा जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली़ यंदा प्रथमच इतक्या कमी संख्येने जनावरे आल्याचे बाजार समितीच्या कर्मचाºयांनी सांगितले़ यावेळी जनावरांसाठी बाजार समितीने वाखरी तळावर पाणी, वीज यांसह मूलभूत गरजा उपलब्ध करून दिल्या होत्या. 

तीन लाखांच्या गायीला सव्वा लाखाची मागणीया बाजारात वैशिष्ट्यपूर्ण गायी पाहावयास मिळाल्या़ तुकाराम शेंबडे यांच्याकडे सहा कपिला जातीची  गायी असून, त्यांनी बाजारात  दोन गायी आणि दोन वासरे विक्रीसाठी आणली होती. त्यातील एक गाय दोन वेळा व्याली असून, सध्या ती गाभण आहे़ तिची किंमत ते तीन लाख रुपये सांगतात, पण ग्राहकांनी सव्वा लाख रुपयांपर्यंत मागणी केल्याचे त्यांनी सांगितले़  या गायीची खरेदी शेतकºयांपेक्षा हौसी व्यक्तीच करू शकते़ कारण ती घरासमोर आकर्षक दिसते़ 

तुपाला सर्वाधिक मागणीकपिला गायीचे दूध  आणि दुधापासून बनविलेले तूप, गोमूत्र, शेण हे खूपच औषधी गुणधर्माचे आहेत. अनेक रोग समूळ नष्ट करते़ त्यामुळे या गायीचे तूप तब्बल ७ हजार रुपये किलोने विकले जाते़ डॉक्टरांकडूनच या तुपाला सर्वाधिक मागणी आहे़ ही गाय एकावेळी चार लिटर आणि दिवसातून आठ लिटर दूध देते.

टॅग्स :Solapurसोलापूरagricultureशेतीmilkदूध