शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

यवतजवळ पहाटे आराम बसच्या अपघातात सोलापुरातील पादत्राण कारखानदाराचा मृत्यू

By काशिनाथ वाघमारे | Updated: October 26, 2023 13:46 IST

शेरखाने हे जोडभावी पेठेत वडिलोपार्जित पादत्राणाचा कारखाना सांभाळताहेत.

सोलापूर : पुणे जिल्ह्यात यवतजवळ गुरुवारी पहाटे झालेल्या आराम बसच्या अपघातात सोलापुरातील पादत्राण कारखानदाराचा मृत्यू झाला तर त्याचा जोडीदार जखमी झाला.

बाळासाहेब जालिंदर शेरखाने (वय ४२, रा. जोडभावी पेठ) असे मरण पावलेल्या पादत्राण कारखानदाराचे नाव असून जखमी जोडीदार संतोष बनसोडे (वय ४०) याच्यावर लोणी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाळासाहेब शेरखानेच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक आणि मित्रांनी त्यांच्या घरी गर्दी केली.

शेरखाने हे जोडभावी पेठेत वडिलोपार्जित पादत्राणाचा कारखाना सांभाळताहेत. ते एक देवीभक्तही आणि संत हरळय्या समाज सेवा नवरात्र महोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष होते. मंगळवारी देवीची मिरवणूक उरकून गुरुवारी पुण्यात पादत्राणाच्या कामासाठी जखमी संतोषसोबत जाचचे निश्चित केले.ते दोघे बुधवार, २५ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ११ वाजता सोलापुरातून खासगी आराम बसने पुण्याला निघाले. गुरवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान त्यांची आराम बस ही यवतजवळ सिमेंट घेऊन निघालेल्या वाहनावर आदळली. या अपघातात शेरखाने आणि बनसोडेंसह अनेक प्रवासी जखमी झाले. त्यांना तत्काळ लोणीजवळील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र शेरखाने यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लोणीहून तत्काळ ससून रुग्णालयात हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.सोशल मीडियावर श्रद्धांजली...राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संजय शिंदे आणि कार्यकर्त्यांनी शेरखाने यांच्या घरी धाव घेतली. पहाटे पाच वाजता काही कार्यकर्ते आणि नातेवाईकांनी ससून रुग्णालयाकडे निघाले. मात्र अपघातातून बाळासाहेब वाचू शकले नाहीत हे समजताच अनेक मित्रांनी सोशल मीडियावर फोटो टाकून श्रद्धांजली वाहिली.

टॅग्स :Accidentअपघात