शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ऊस बिल थकवल्याप्रकरणी माजी आमदार पुत्रासह मकाई कारखान्याच्या १७ संचालकांवर गुन्हा दाखल

By दिपक दुपारगुडे | Updated: April 11, 2024 18:59 IST

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिलाची वारंवार मागणी करूनही बिल न मिळाल्यामुळे आळजापूर येथील समाधान शिवदास रणसिंग या ऊस उत्पादक शेतकऱ्याने ॲड. अनिल पुंजाबा कांबळे यांच्यामार्फत करमाळा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती.

सोलापूर : ऊस बिल थकवल्याप्रकरणी करमाळा न्यायालयाच्या आदेशानुसार मकाई कारखान्याचे तत्कालीन चेअरमन तथा माजी आमदार पुत्र दिग्विजय बागल यांच्यासह १७ संचालकांवर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिलाची वारंवार मागणी करूनही बिल न मिळाल्यामुळे आळजापूर येथील समाधान शिवदास रणसिंग या ऊस उत्पादक शेतकऱ्याने ॲड. अनिल पुंजाबा कांबळे यांच्यामार्फत करमाळा न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली होती. यानंतर न्यायाधीश बी. ए. भोसले यांनी गुरुवार दि. ४ रोजी मकाईच्या तत्कालीन संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार करमाळा पोलिसांनी मकाई सहकारी साखर लि. च्या तत्कालीन संचालक मंडळातील १६ संचालक आणि तत्कालीन प्रभारी कार्यकारी संचालक यांच्यासह एकूण १७ जणांवर ऊस नियंत्रण आदेश १९६६ कलम-३ आणि जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ कलम ३ व ७ अन्वये, तसेच आयपीसी कलम ४२० व ४०६ सह कलम ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे पुढील तपास करीत आहेत.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा...दिग्विजय दिगंबरराव बागल, उत्तम विठ्ठल पांढरे, महादेव निवृत्ती गुंजाळ, नंदकिशोर विष्णुपंत भोसले, गोकुळ बाबुराव नलवडे, बाळासाहेब उत्तम सरडे, महादेव त्रिबंक सरडे, सुनिल दिंगबर शिंदे, रामचंद्र दगडु हाके, धर्मराज पंढरीनाथ नाळे, नितीन रामदास राख, रंजना बापु कदम, उमा सुनिल फरतडे, राणी सुनिल लोखंडे, संतोष साहेबराव पाटील, दत्तात्रय म्हाळु गायकवाड, प्र. कार्यकारी संचालक हरिशचंद्र प्रकाश खाटमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेCourtन्यायालय