शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

९४१४ कोटींचा पतपुरवठा आराखडा; पीककर्ज, शेतीसाठीच्या कर्जाला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 16:40 IST

सोलापूर जिल्हा; शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट व सर्वांसाठी घरे उपलब्ध होणार

ठळक मुद्देसन २०२०-२१ आर्थिक वषार्साठीचा संभाव्य् पतपुरवठा आराखडा नाबार्डच्यावतीने तयार हा आराखडा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सादर करण्यात आलाया आराखडयातील नियोजनानुसार बॅकांनी पतपुरवठा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यासाठी  सन २०२०-२१ साठीच्या ९४१४.५७ कोटी रुपयांच्या वार्षिक पतपुरवठा आराखडयास मंजुरी देण्यात आली. या आराखडयात पीक कर्ज आणि शेतीसाठीचे भांडवली कर्जाला प्राधान्य देण्यात आले असून  या दोन्ही घटकांसाठी ६७४६.५८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक संतोष सोनवणे  यांनी दिली.

सन २०२०-२१ आर्थिक वषार्साठीचा संभाव्य् पतपुरवठा आराखडा नाबार्डच्यावतीने तयार करण्यात आला. हा आराखडा नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. या आराखडयातील नियोजनानुसार बॅकांनी पतपुरवठा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. या वेळी बॅक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक अजय कडू, नाबाडार्चे जिल्हा व्यवस्थापक  प्रदीप झिले, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, आदी उपस्थित होते.

सोनवणे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या शेतक-यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करणे आणि सर्वासाठी घरे उपल्ब्ध करुन देणे या धोरणानुसार हा पतपुरवठा आराखडा निश्चित करण्यात आला आहे. आराखडयात शेती आणि शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात आले आहे.

 पतपुरवठयातील नियोजन-

  • पीक कर्ज- 4051.01 कोटी रुपये.
  • शेतीसाठी भांडवली कर्ज- 2695.57 कोटी रुपये.
  •  लघु आणि मध्यम उदयोग- 1916.28 कोटी रुपये.
  •  शैक्षणिक कर्ज- 122.29 कोटी रुपये.
  •  गृह कर्ज- 507.55 कोटी रुपये.
  • वैकल्पिक उर्जा उदयोग- 17.09 कोटी रुपये.
  • सामाजिक विकास क्षेत्र- 86.33 कोटी रुपये.
  •  निर्यात उदयोग- 18.45 कोटी रुपये.
टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीagricultureशेती