शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात ९ पॉझीटिव्ह तर ग्रामीणमधील ६७ 'कोरोना' बाधित निगेटिव्ह...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 20:46 IST

'कोरोना' रुग्णांची संख्या झाली १११; शास्त्रीनगरातील एकाच घरातील छोट्या भाऊ बहिणीला लागण

ठळक मुद्देउपचारानंतर बरे झालेले सात रुग्ण घरी पाठवलेसोलापूर शहरातील सर्वच नागरिकांची आरोग्य तपासणीसंचारबंदीमुळे सोलापूर शहर पोलीस अलर्ट

सोलापूर : सोलापुरात शुक्रवारी नव्याने ९ पॉझीटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता  कोरोना रुग्णांची संख्या १११ इतकी झाली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये शास्त्रीनगरातील चारजण असून, छोट्या भाऊ व बहिणीलाही बाधा झाल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागातून म्हणजेच अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव व पंढरपुरातील ६७ संशयितांचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

सोलापूर शहरात जुन्याच हॉटस्पॉटमध्ये आठ रुग्ण आढळले आहेत. तर बाळे येथील संतोषनगरातील एका नर्सला कोरोणाची बाधा झाल्याने हा परिसर सील करण्यात आला आहे. त्रास होऊ लागल्याने २८ एप्रिल रोजी तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान स्वॅब घेण्यात आल्यावर अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. शास्त्रीनगरात पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना केगाव येथील क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यातील चौघांचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. यामध्ये शानदार चौकातील एक १३ वर्षाची मुलगी व तिचा ११ वर्षाचा भाऊ आणि ३0 वर्षाच्या व्यक्तीला लागण झाली आहे. तसेच ताई चौकाील रवींद्रनगरात राहणाºया ५१ वर्षाची महिला, २५ वर्षाचा तरुण, न्यू पाच्छापेठेतील २८ वर्षाच्या महिलेस 'कोरोना'ची लागण झाली आहे.

राहुलगांधी झोपडपट्टीतील एका ६0 वर्षाच्या वृद्धेस सारीची लक्षणे आढळली म्हणून उपचारास दाखल केल्यावर अहवाल 'कोरोना' पॉझीटीव्ह आला आहे.अशा प्रकारे 'कोरोना' पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या १११ झाली आहे. यातील सहाजण मरण पावले आहेत, तर उपचारानंतर बरे झालेले गुरूवारी ३ आणि शुक्रवारी ७ जणांना सोडण्यात आले. यामुळे आता रुग्णालयात उपचार घेणाºयांची संख्या ९५ इतकी आहे.

ग्रामीणमधील लोकांना दिलासा

यापूर्वी चपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व पाटकुलच्या महिलेच्या संपर्कात आलेल्या पंढरपुरातील अनेकांना इन्स्टिट्युट क्वारंटाईन करण्यात आले आहे. या लोकांचे अहवाल काय येतात याबाबत सर्वांचा उत्सुकता होती. चपळगावच्या २0 तर पंढरपूरच्या ४५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  

शुक्रवारचे असे आहेत रुग्ण

ताई चौक:२न्यू पाच्छापेठ: १राहुलगांधी झोपडपट्टी: १संतोषनगर, बाळे: १शास्त्रीनगर: ४

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस