शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 12:39 IST

३१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल : २३ जून रोजी होणार मतदान

ठळक मुद्दे मतदान २३  जून  रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईलया निवडणुकीसाठी  ३१ मे ते ६ जून  या कालावधीत अर्ज तहसील कार्यालयात स्वीकारले जातील

सोलापूर : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका सोमवारी जाहीर केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ९७ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या १३७ सदस्यांच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत आहे. यासाठी ३१ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात सुरू करण्यात येत असून, २३ जून रोजी मतदान घेण्यात येत आहे. 

 राज्यातील विविध २०  जिल्ह्यांमधील १४६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच ६२ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील ६  हजार ७१९  सदस्य पदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुका घेण्यात येत आहेत. यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे.

या निवडणुकीसाठी  ३१ मे ते ६ जून  या कालावधीत अर्ज तहसील कार्यालयात स्वीकारले जातील. २  व ५ जून या दोन सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी ७ जून  रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे १0  जूनपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल.

 मतदान २३  जून  रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल.अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेकडून देण्यात आली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत