शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाळू वाहतूक करणाºया सोलापूर जिल्ह्यातील ८६ वाहनांची नोंदणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 13:34 IST

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची माहिती, ६५ लाखांचा केला दंड

ठळक मुद्दे जिल्हा प्राधिकरण समितीची पुनर्रचना करण्यात आली सुरक्षा सप्ताहास २३ एप्रिलपासून प्रारंभ करण्यात येणारआरटीओ कार्यालयास सन २0१७-१८ या वर्षासाठी १४१ कोटींचे महसूल उद्दिष्ट

सोलापूर: ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी राबविलेल्या वाळूचोरी मोहिमेत कारवाई केलेल्या ८६ वाहनांची नोंदणी चार महिन्यांसाठी निलंबित केली आहे, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांनी दिली. 

मार्चअखेर जिल्ह्यात वाळू वाहतूक करणाºया ९१ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यात पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी मंगळवेढा, वैराग, अक्कलकोट, मोहोळ आणि पंढरपूर या ठिकाणी विशेष पथकामार्फत मोहीम राबविली. या पथकाच्या कारवाईत ८६ वाहने सापडली. त्यामध्ये २३ ट्रक, २५ ट्रॅक्टर, २८ मोटरसायकली, ६ जेसीबी, ४ जीपचा समावेश आहे. वाळू वाहतूक करणाºया ट्रक व ट्रॅक्टर अशा ४८ वाहनांची नोंदणी दोन महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे.

त्याचबरोबर वाळू वाहतुकीसाठी सहाय्य करणाºया मोटरसायकली, जेसीबी, जीप अशा ३८ वाहनांची नोंदणी चार महिन्यांसाठी निलंबित करण्यात आली आहे. याबाबत संबंधित वाहन मालकांना नोटिसा दिल्या आहेत. वाळू वाहतूक करताना पकडलेली ही वाहने ज्या त्या पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे हा निलंबन कालावधी पूर्ण होईपर्यंत ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारातच राहतील. 

आरटीओ कार्यालयास सन २0१७-१८ या वर्षासाठी १४१ कोटींचे महसूल उद्दिष्ट दिलेले असताना १६0 कोटी कर वसूल केला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत उद्दिष्टापेक्षा १९ टक्के जादा कर वसूल करण्याचा उच्चांक झाला आहे. यापूर्वी सन २0१५-१६ या वर्षात ११३ कोटींचे उद्दिष्ट असताना ११४ कोटी २५ लाख व सन २0१६—१७ या वर्षात १0७ कोटीचे उद्दिष्ट असताना १२७ कोटींचा महसूल गोळा झाला होता. यात या वर्षात ३३ कोटींची वाढ दिसून येत आहे. 

एप्रिलमध्ये सुरक्षा सप्ताह- यावर्षी जिल्हा प्राधिकरण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये साजरा होणारा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह लांबणीवर पडला होता. आता सुरक्षा सप्ताहास २३ एप्रिलपासून प्रारंभ करण्यात येणार आहे. सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस वाहतूक शाखेच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. याची तयारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीस