शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यात करणार ८५ लाख वृक्ष लागवड

By appasaheb.patil | Updated: July 3, 2019 18:32 IST

पालकमंत्री विजय देशमुख यांच्या हस्ते उद्या होणार अभियानाचा शुभारंभ

ठळक मुद्देराज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अभियान राबवण्यात येणारसोलापूर जिल्ह्यास 85.52 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्टजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन

सोलापूर : राज्य शासनाच्या वन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या 33 कोटी वृक्ष लागवड अभियानात जिल्ह्यात 85.52 लाख वृक्ष लागवड केली जाणार आहे. यासाठी सुमारे 80 लाख खड्डे खोदून पूर्ण झाले असून  90.41 लाख रोपांची निर्मिती करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक पी. एच. बडगे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी राज्य शासनाकडून गेल्या तीन वर्षात 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. 2017 मध्ये चार कोटी, 2018 मध्ये 13 कोटी आणि यंदा 33 कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचा मुख्य कार्यक्रम पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्या, गुरुवार 4 जुलै 2019 रोजी  सिध्देश्वर वन विहार येथे सकाळी नऊ वाजता होणार आहे, असेही श्री. बडगे यांनी सांगितले.

राज्यात एक जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अभियान राबवण्यात येणार आहे. या कालावधीत सोलापूर जिल्ह्यास 85.52 लाख रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विविध विभागांना उद्दिष्ट आहे. यापैकी वन विभागास 19.20 लाख, सामाजिक वनीकरण विभागास 12 लाख, ग्रामपंचायतींना 32.94 लाख, कृषी विभागास 2.10 लाख, रेशीम विकास विभागास 8.36 लाख तर ग्रामीण विकास विभागास 7 लाखांच्या वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका 2.20 लाख रोपे लावणार आहे. रोपे लागवडीसाठी 78.47 लाख खड्डे खोदून पूर्ण झाले आहेत. या कामाची शासनाच्या संकेतस्थळावरही नोंद करण्यात आली आहे, असे बडगे यांनी सांगितले.   

वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि रेशीम विकास विभाग उद्दिष्टापेक्षा जास्त रोपे लागवड करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात  उद्दिष्टापेक्षा जास्त रोपांची लागवड होईल, असा विश्वास बडगे यांनी व्यक्त केला .-----------90.41 लाख रोपांची निर्मितीवृक्ष लागवडीसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून 50.05 लाख तर वनविभागाकडून 40.36 लाख रोपांची तयारी करण्यात आली आहेत. सामाजिक वनीकरण विभाग जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीना रोपांचा पूरवठा करणार आहे. इतर विभागांना वन विभागाकडून रोपे पुरवली जाणार आहेत, असे बडगे यांनी सांगितले.-------------जिल्हा परिषदेला सर्वाधिक उद्दिष्ट जिल्ह्यातील वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाला सात लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वन विभाग 19.20 लाख, सामाजिक वनीकरण विभाग 12 लाख, कृषी  2.10 लाख, रेशीम विकास विभाग 8.36 लाख, तर महानगरपालिका 2.20 लाख रोपे लावणार आहे, असे  बडगे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरgovernment schemeसरकारी योजनाagricultureशेतीenvironmentपर्यावरण