शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील लक्ष्मी मार्केटचा ८ कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 14:14 IST

सहा महिन्यांत होणार काम पूर्ण, स्मार्ट सिटी योजनेतून करणार विकास

ठळक मुद्देहोम मैदानाच्या विकासासाठी २ कोटी ४५ लाख खर्चरंगभवन चौकात सौरउर्जेवर आधारित पब्लिक प्लाझा उभारण्याचे काम सुरू स्मार्ट सिटी एरियातील नागरिकांना डस्टबिनचे वाटप

सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेतून सुमारे आठ कोटी खर्चून लक्ष्मी मंडईचा लूक बदलण्याचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाºयांबरोबर मंगळवारी बैठक घेऊन लक्ष्मी मार्केटचा लूक बदलण्यासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सुमारे ८ कोटी खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

लक्ष्मी मार्केटची इमारत हेरिटेज आहे. त्यामुळे इमारतीला हात न लावता परिसर सुधारणा करण्यात येणार आहेत. हा भाग स्मार्ट सिटी एबीडी एरियातील आहे. सध्या सिद्धेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मंदिराच्या मागील द्वाराजवळ हे ऐतिहासिक मार्केट आहे. मार्केटच्याभोवती झालेले अतिक्रमण व आतील विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. हा लूक बदलण्यात येणार आहे.

इमारतीचे नूतनीकरण करून सभोवतालचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. परिसरात वनराई व पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये भाजी, किराणा, फळे, मसाला बाजार असे वेगवेगळे विभाग करण्याचे नियोजन आहे. यामुळे आतील ओटे व गाळे वाढणार असल्याने अनेक व्यापाºयांना संधी मिळणार आहे. चारही बाजूने प्रशस्त रस्ते, सर्व व्यापाºयांना फक्त मार्केटमध्येच बसण्याची सक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच लक्ष्मी मार्केटचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे.

स्मार्ट सिटीची तीन वर्षे- केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरची नवव्या क्रमांकाने घोषणा होऊन २५ जून रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. सद्यस्थितीत देशातील स्मार्ट सिटीचा विचार करता कामाच्या बाबतीत सोलापूर आता २४ व्या क्रमांकावर गेले आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत फक्त १४ प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामधील स्मार्ट रोडचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे.

रंगभवन चौकात सौरउर्जेवर आधारित पब्लिक प्लाझा उभारण्याचे काम सुरू आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत शहर स्वच्छ करण्यासाठी घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. स्मार्ट सिटी एरियातील नागरिकांना डस्टबिनचे वाटप करण्याचा ठेका नागपूरच्या पॉली फिल्म कंपनीला दिला आहे. घंटागाड्यांतून कचरा ट्रान्सफर करण्यासाठी चार ठिकाणी स्टेशनची उभारणी करण्याचा ठेका टीपीएस इन्फ्राला दिला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जागृती करण्याचा ठेका पुण्याच्या मिटकॉन कन्स्लटन्सीला दिला आहे. एलईडी स्ट्रिट लाईट उभारणी, रूफ टॉप सोलरचे काम सुरू आहे. हुतात्मा बागेचे सुशोभीकरण सुरू आहे.

- होम मैदानाच्या विकासासाठी २ कोटी ४५ लाख खर्च येणार असून, टेंडर काढले आहे. पासपोर्ट कार्यालयाजवळ नर्सरी    उभी केली जाणार आहे. एबीडी एरियात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनीत बदल करण्याचा ठेका देण्यात आला आहे. पाच ठिकाणी १0 ई-टॉयलेट उभारण्यात आले आहेत.स्काडा, बायोमेट्रिक व विविध कामांच्या प्रगतीसाठी महापालिकेच्या मागील बाजूस कमांड व कंट्रोल मुख्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे. ईदगाह मैदानाचे सुशोभीकरण, नागरिकांसाठी तक्रार निवारण केंद्र, अर्बन डिझाईन प्रोजेक्ट घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका