शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

पंढरपुरात परिचारकांचा ७/१२ चा नारा

By admin | Updated: February 24, 2017 18:36 IST

पं़ स़ एकहाती सत्ता : भाजपचे कमळ फुलले

पंढरपुरात परिचारकांचा ७/१२ चा नाराप्रभू पुजारी - आॅनलाइन लोकमत पंढरपूरपंढरपूर तालुक्यात आ़ प्रशांत परिचारक यांनी भाजप, पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडी आणि शिवसेना अशी आघाडी करून जि़ प़ आणि पं़ स़ ची निवडणूक लढविली होती़ यामध्ये त्यांच्या या आघाडीला जि़ प़ च्या ८ पैकी ७ जागा तर पं़ स़ च्या १६ पैकी १२ जागा मिळाल्या आहेत़ त्यामुळे परिचारक गटाचा ७/१२ नारा यशस्वी झाला आहे़ शिवाय पंढरपूर पं़ स़ वर एकहाती सत्ता मिळविण्यात यश आले आहे़ पंढरपूर तालुक्यात प्रथम कमळ फुलले आहे़ भाजपाला जि़ प़ च्या ८ पैकी ४ तर पं़ स़ च्या १६ पैकी ७ जागांवर यश मिळवता आले आहे़ पंढरपूर तालुक्यात जवळपास निम्म्या जागा या भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्या आहेत़पंढरपूर तालुक्यात पांडुरंग आणि विठ्ठल परिवारातच काट्याची टक्कर होत असते़यावेळी पांडुरंग परिवाराने भाजपा आणि शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढविली होती़ भालके-काळे-पाटील-महाडिक गटाने काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भीमा परिवार यांची मोट बांधून निवडणूक लढविली़ तरीही त्यांना या निवडणुकीत यश मिळाले नाही़ केवळ जि़ प़ च्या एका आणि पं़ स़ च्या चार जागांवर समाधान मानावे लागले़स़ शि़ वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन वसंतराव काळे यांचे बंधू समाधान काळे यांना पिराची कुरोली पं़ स़ गणातून पराभव स्वीकारावा लागला़ तसेच कल्याणराव काळे यांना हक्काचा भाळवणी गट राखण्यात अपयश आले़ तसेच आ़ भारत भालके यांना कासेगाव जि़ प़ गटासह कासेगाव गण आणि स्वत:चे गाव असलेले सरकोली पं़ स़ गणही ही राखता आला नाही़ राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील यांना मात्र भोसे जि़ प़ गट आणि गण हे दोन्ही स्वत:कडे खेचून आणण्यात यश आले़ या ठिकाणी त्यांचे वर्चस्व असल्याचे निकालावरून दिसून आले़ रोपळे जि़ प़ गटात बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन हळणवर यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले़या निवडणुकीत करकंब जि़ प़ गटातील पं़ मं़ विकास आघाडीच्या उमेदवार रजनी देशमुख या तब्बल १५ हजार ७४७ मते घेऊन तालुक्यात सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या तर पं़ मं़ विकास आघाडीचे वसंतराव देशमुख आणि काँग्रेसचे भगीरथ भालके यांच्यात अटीतटीची टक्कर होऊन केवळ सर्वाधिक कमी म्हणजेच ३२५ मतांनी देशमुख विजयी झाले़ पं़ स़ निवडणुकीत उंबरे गणातील पं़ मं़ विकास आघाडीच्या अर्चना व्हरगर यांना ६ हजार ६२० ही सर्वाधिक मते घेऊन विजयी झाल्या़ तसेच गुरसाळे पं़ स़ गणातील भाजपचे उमेदवार राजेंद्र पाटील हे ३ हजार ३८७ मते घेऊन विजयी झाले़ -----------------------------निवडणूक मॅरेथॉनमध्ये आमदार पुत्राचा पराभवकासेगाव जि़ प़ गटात आ़ भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके आणि पांडुरंग साखर कारखान्याचे व्हा़ चेअरमन वसंतराव देशमुख यांच्यात आज निवडणुकीच्या निकालानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा पाहायला मिळाली़ वसंतराव देशमुख हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते़ शेवटी शेवटी भगीरथ भालके हे त्यांना मागे टाकून पुढे जातील, असे वाटत होते़ कारण देशमुख त्यांचे मताधिक्य कमी कमी होत होते; मात्र भगीरथ भालके शेवटपर्यंत पुढे जाऊ शकले नाहीत़ अखेर ही निवडणुकीची मॅरेथॉन स्पर्धा वसंतराव देशमुख यांनी ३२५ मतांनी जिंकली आणि आ़ भारत भालके यांच्या चिरंजीवांना हार पत्करावी लागली़------------------------पक्षीय बलाबलजि़ प़ गट : भाजप ४, पंढरपूर-मंगळवेढा विकास आघाडी ३, राष्ट्रवादी १़पं़ स़ गण : भाजप ७, पं़-मं़ विकास आघाडी ४, शिवसेना १, राष्ट्रवादी २, काँग्रेस १, भीमा परिवार १