शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
4
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
5
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
6
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
7
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
8
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
9
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
10
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
11
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
12
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
13
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
14
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
15
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
16
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
17
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
18
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
19
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
20
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर

शेळीच्या नावाखाली ७० लोकांचा ‘बकरा’; सव्वातीन कोटींची केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:48 PM

सोलापुरातील घटना; प्रकल्प गुंडाळून डायरेक्टर सोलापुरातून पळून गेला

ठळक मुद्दे आॅफिस बंद झाल्यामुळे आपली फसवणूक झाली असे गुंतवणूकदारांच्या लक्षात आलेसरफराज अमीर शेख (वय ४३, रा. आदर्श नगर, ) यांनी पोलिसात धाव घेतली याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे

सोलापूर : शेळीपालन व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगून सोलापुरातील सत्तर लोकांकडून तीन कोटी २३ लाख पाच हजार ५०० रुपयाला फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुंतवणुकीवर प्रतिमहिना तीन ते चार टक्के व्याज देत होता; मात्र प्रकल्प गुंडाळून डायरेक्टर सोलापुरातून पळून गेला. 

अकिबखान हारुनखान पठाण (रा.श्रीशैल मल्लिकार्जुन नगर, होटगी रोड) व अलीनवाज इमामहुसेन सय्यद (रा. अंबिकानगर, नई जिंदगी, मजरेवाडी) या दोघांनी अलहिलाल बिझनेस कन्सेप्ट प्रा. लि. नावाने सोरेगाव येथे गोट फार्म काढले होते. याचे आॅफिस विजापूर रोडवरील वॉटरफ्रंट बिल्डिंगमधील गाळा नंबर १२ मध्ये थाटले होते. गुंतवणुकीवर प्रतिमहिना दोन ते तीन टक्के व्याज देण्याचे आश्वासन दोघे देत होते. यावर विश्वास ठेवून ग्रामीण भागातील काही शेतकरी तर बहुतांश शहरी भागातील लोकांनी पाच लाख, दहा लाख, पंधरा लाख रुपये अशा पद्धतीने गुंतवणूक केली होती. २०१७ मध्ये स्थापन केलेल्या फार्मच्या नावाने दोघांनी लोकांकडून पैसे घेतले. दोघांनी काही दिवस गुंतवणूकदारांना नियमित व्याज दिले; मात्र नंतर त्यांनी व्याज देणे बंद केले. गुंतवणूकदारांचा पैशासाठी तगादा सुरू झाल्यानंतर दोघांनीही वॉटर फ्रंट येथील आॅफिस बंद केले. 

 आॅफिस बंद झाल्यामुळे आपली फसवणूक झाली असे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले. सरफराज अमीर शेख (वय ४३, रा. आदर्श नगर, लक्ष्मीनारायण टॉकीजच्या पाठीमागे) यांनी पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. 

गोट फार्म होते दुसºयाचे अकिबखान हारुनखान पठाण (रा.श्रीशैल मल्लिकार्जुन नगर, होटगी रोड) व अलीनवाज इमामहुसेन सय्यद (रा. अंबिकानगर, नई जिंदगी, मजरेवाडी) या दोघांनी सोरेगाव येथील गोट फार्म दाखवून कंपनीचा हा व्यवसाय असल्याचे गुंतवणूकदारांना सांगत होते.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी