शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीत ६३ जागांसाठी ७ हजार ६०० अर्ज

By admin | Updated: March 24, 2017 14:03 IST

सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीत ६३ जागांसाठी ७ हजार ६०० अर्ज

सोलापूर ग्रामीण पोलीस भरतीत ६३ जागांसाठी ७ हजार ६०० अर्जसोलापूर : आप्पासाहेब पाटीलमहाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार पोलीस अधीक्षक एस़ वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पारदर्शक व नियोजनबद्ध पोलीस भरती प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे़ ग्रामीणच्या ५३ जागांसाठी तब्बल ७ हजार ६०० अर्ज दाखल झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस़ वीरेश प्रभू व पोलीस उपायुक्त (मुख्यालय) दिलीप चौगुले यांनी दिली़ दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील रिक्त असलेल्या 6३ जागांच्या भरतीसाठी २३ फेबु्रवारी रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली़ २४ फेबु्रवारीपासून आॅनलाईन पध्दतीने अर्ज भरण्यास प्रारंभ झाला़ अर्ज भरण्याची शेवटची तारीख १७ मार्च होती़ त्यानंतर २१ मार्च अखेरपर्यंत बँकेत डीडी काढण्यासाठी मुभा देण्यात आली होती़ त्यानुसार ग्रामीण दलातील ५३ जागांसाठी ७ हजार ६०० अर्ज दाखल झाले आहेत़ महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) नियम २०१२ व शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व घटकाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या ५३ व अनुकंपा तत्त्वावरील १० जागांसाठी पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ शासनाने मंजुरी दिलेली ७५ टक्के पदेच भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाने कळविले आहे़ -------------------------अशा आहेत जागा (आरक्षणनिहाय) सर्वसाधारण : १५महिला : १६खेळाडू : ३प्रकल्पग्रस्त : ३भूकंपग्रस्त : १माजी सैनिक : ८़अंशकालीन पदवीधर : ३पोलीस पाल्य : १गृहरक्षक दल : ३एकूण : ५३-------------------------पोलीस मुख्यालय मैदान सज्जसन २०१७ च्या पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे़ त्यासाठी राज्यातील ६१ पोलीस मुख्यालयाचे ठिकाण व मैदानावर याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे़ याठिकाणी उमेदवारांसाठी योग्य त्या सेवासुविधा व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे़ शिवाय भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणाऱ्या सर्व सेवा पुरविण्यासाठी ग्रामीण पोलीस दल सज्ज आहे़ -----------------------३०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचे परिश्रम़़़़सोलापूर ग्रामीण पोलीस भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे़ पोलीस अधीक्षक एस़ वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) दिलीप चौगुले यांच्यासह ३०० अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. पहाटे ५ वाजता कागदपत्रांची तपासणी करून उमेदवारास मैदानावर प्रवेश देण्यात येत आहे़ त्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत मैदानी चाचणी घेण्यात येत आहे़ ३१ मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे़ त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे़ दरम्यान, गुणवत्ता यादीही प्रसिध्द करण्यात येणार आहे़-------------------------कसरतीसाठी मैदाने हाऊसफुल्ल़़़राज्यात सर्वत्र पोलीस भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे़ त्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी रात्रंदिवस कसरत करण्यास सुरुवात केली आहे़ धावणे, लांब उडी, पुलअप्स आदी मैदानी चाचणीसाठी लागणाऱ्या परीक्षांसाठी शाळा, महाविद्यालय, इतर शासकीय मैदाने पहाटे व सायंकाळी हाऊसफुल्ल दिसून येत आहेत़ कोणत्याही परिस्थितीत मी पोलीस होणारच हेच ध्येय बाळगून इच्छुक उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत़ -----------------शासनाने मंजुरी दिलेल्या सूचनेनुसार सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडील ५३ व अनुकंपा तत्त्वावरील १० जागांसाठी भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे़ पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवाराने त्याबाबतची माहिती पोलिसांना तत्काळ द्यावी़ पारदर्शक भरती प्रक्रियेस उमेदवारांनी सहकार्य करावे़-एस़ वीरेश प्रभूपोलीस अधीक्षक, ग्रामीण पोलीस, सोलापूऱ----------------सोलापूर अधीक्षक कार्यालयाकडील रिक्त असलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे़ उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची संपूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे़ पोलीस भरती प्रक्रियेसाठी ३०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही उमेदवारास अडचण आल्यास तत्काळ पोलीस मदत केंद्राशी संपर्क साधावा़-दिलीप चौगुलेपोलीस उपायुक्त (मुख्यालय), सोलापूऱ