शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेत सोलापूर जिल्ह्यातील ७८ हजार ५२७ शेतकरी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 19:15 IST

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर याची माहिती; पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर अपलोड

ठळक मुद्दे- कर्जमाफीसाठी आणखीन शेतकºयांची नावे वाढण्याची शक्यता- अधिकारी, कर्मचाºयांना दिले जिल्हा प्रशासनाने प्रशिक्षण- कर्जमाफी शेतकºयांच्या नावे पोर्टलवर अपलोड 

सोलापूर :  महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ७८ हजार ५२७ पात्र शेतकºयांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज आढावा बैठक घेतली. त्यांनतर त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़  नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, तहसिलदार श्रीकांत पाटील, अग्रणी बँक व्यवस्थापक किसन मोटे आदी उपस्थित होते.

या बैठकीत अग्रणी व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सार्वजनिक क्षेत्रातील बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या ७८ हजार ५२७ कर्जदार शेतकºयांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.  यामध्ये आणखी काही प्रमाणात शेतकºयांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  नावे अपलोड करण्याच्या पहिल्या टप्याची मुदत उद्या म्हणजे १५ फेब्रुवारीपर्यंत आहे, असे सोनवणे यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पंढरपूर, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व संबंधितांचे प्रशिक्षण घेण्यात आले. हया प्रशिक्षणात तहसिलदार, गटविकास अधिकारी, गावातील महाआॅनलाईन, आपले सरकार, संग्राम केंद्राचे चालक यांचा समावेश होता. शुक्रवारी करमाळा, माढा, बार्शी आणि मोहोळ या तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले.  यामध्ये करमाळाचे सहायक निबंधक दीपक तिजोरे, आबासाहेब गावडे यांनी कर्जमाफीची प्रक्रीया कशी राबवावी, काय काळजी घ्यावी याबाबत प्रशिक्षण दिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेती