शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी फसवी लिंक पाठवून ४८ हजाराला गंडवले

By विलास जळकोटकर | Updated: June 16, 2024 18:29 IST

कॉलेज लिपिकाची ठाण्यात धाव : फसवणुकीचा गुन्हा दाखल

विलास जळकोटकर, सोलापूर : क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी फसवी लिंक पाठवून महाविद्यालयीन लिपिकाला ४८ हजार ५६६ रुपयास गंडवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जेलरोड पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. शकील मुर्तूज हिरोली (वय ४६, मुस्लिम पाच्छा पेठ, सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी शहरातील एका महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत आहेत. ४ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते कॉलेजमध्ये काम करीत असताना अज्ञात व्यक्तीकडून १८६०५००५५५ या क्रमांकावरुन फोन आला. त्याने ॲक्सिस बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून फिर्यादीला क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्यासाठी कॉल केला व एक लिंक एसएमस केला. ती लिंक ओपन करुन फिर्यादीने स्वत:ची जन्मतारीख टाकल्यानंतर आलेला कोड लिंकला शेअर केल्यावर क्रेडिट लिमिट वाढेल असे आमिष अज्ञाताकडून दाखवण्यात आले.

फिर्यादीचा विश्वास संपादन करुन संबंधित अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या खात्यातील ४८ हजार ५६६ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.  या प्रकरणी फिर्यादीने जेलरोड पोलीस ठाण्यात दधाव घेऊन तक्रार दिली असून, तपास पोलीस निरीक्षक बिराजदार करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी