शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

घराच्या ओढीनं निघाले, 'ते' 978 तरुण; ४८ दिवसांचा हुंदका...चालत्या रेल्वेत विरला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 15:57 IST

सोलापूर जिल्ह्यातील परप्रांतीय तामिळनाडूकडे रवाना; खास रेल्वेची व्यवस्था, सोलापूरकरांचे मानले आभार

पंढरपूर : कोरोनामुळेला लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये अडकलेल्या तामिळनाडूमधील ९८१ कामगार, मजूर व विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्ससिंगचे पालन करत खास रेल्वेने तिरुचिरापल्ली या गावाकडे रवाना करण्यात आले.

सोलापूरवरून २२ डब्याची रेल्वे पंढरपूरमध्ये १० वाजता आली आहे. सोलापूरमध्ये या रेल्वे यांचे निर्जंतुकीकरण झाले होते, त्याचबरोबर पंढरपूरमध्ये देखील करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता पंढरपूरमध्ये विविध ठिकाणी ठेवण्यात आलेले तामिळनाडूचे ६१० कामगार मजूर विद्यार्थी रेल्वे स्टेशनवर आणण्यात आले. त्याचबरोबर दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, माढा, मंद्रूप आदी ठिकाणाहून ३७४ लोकांना पंढरपूरमध्ये आणण्यात आले होते. तामिळनाडूकडे जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यांच्यामध्ये तोरणाची लक्षणे नसल्याने त्यांना गावाकडे जाण्यास परवानगी देण्यात आली. प्रत्येकी माणसी ५६० रुपये तिकीट ठेवण्यात आले. रेल्वे प्रशासनाकडे एकूण ५ लाख ४९ हजार ३६० रुपये भरण्यात आले आहे. 

एका डब्यामध्ये ८० लोक बसतात. मात्र कोरोनामुळे एका डब्यामध्ये ५४ लोक बसतील अशी व्यवस्था करण्यात आली होती.  ही ट्रेन रविवारी दुपारी दोन वाजता तिरुचिरापल्ली या गावामध्ये पोहोचणार आहे. 

या सर्व लोकांचे त्या-त्या गावातील प्रशासनाने सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या मदतीने जेवण्याची राहण्याची सोय केली. यांना निरोप देण्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, तहसीलदार वैशाली वाघमारे, पंढरपूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक जे.पी. चनगौड, यातायात निरीक्षक ए. के. श्रीवास्तव आदी उपस्थित होते.  

महाराष्ट्रातील प्रशासनाने उत्तम सोय केली. मागील सहा महिन्यापासून आम्ही पंढरपूरमध्ये राहत होतो. कोरोनामुळे सबंध देशात लॉकडाऊन करण्यात आले. यामुळे आम्ही ६१० जण पंढरपुरातच अडकलो परंतु या ठिकाणच्या प्रशासनाने सामाजिक संघटनांनी आमची उत्तम सोय केली आहे. मागील ४८ दिवसापासून आम्हाला दैनंदिन वापराच्या वस्तू नाष्टा दोन टाईम जेवण वेळेवर मिळाले. सर्व प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे व सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करत असल्याचे गौतम राजन (रा. मदुराई, तामिळनाडू) यांनी सांगितले. 

तामिळनाडूच्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद...

आपल्या गावाकडे जात असल्याचा आनंद प्रत्येक तामिळनाडूच्या नागरिकावर पाहण्यास मिळत होता. त्याचबरोबर या सर्व लोकांना ४८ दिवस व्यवस्थित सांभाळले व त्यांना त्यांच्या गावी सुखरूप पोहोचतो करण्यात यशस्वी झाल्याचे समाधान देखील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळत होते.

या गावातील एवढे लोक

  • मंद्रूप : ४७
  • पंढरपूर : ६१०
  • माढा : २७
  • सोलापूर शहर : १७९
  • उत्तर सोलापूर : २८
  • उस्मानाबाद : ९०
टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेTamilnaduतामिळनाडू