बसेसच्या फेऱ्या घटल्याने कुर्डूवाडी आगाराला दररोज ४.५ लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:22 AM2021-04-22T04:22:01+5:302021-04-22T04:22:01+5:30

कुर्डूवाडी : दुसऱ्या टप्प्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे कुर्डूवाडी आगारातील अनेक बसेसच्या ग्रामीण व शहरी फेऱ्या रद्द झाल्या आहेत. काही ...

4.5 lakh daily hit Kurduwadi depot due to reduction in bus services | बसेसच्या फेऱ्या घटल्याने कुर्डूवाडी आगाराला दररोज ४.५ लाखांचा फटका

बसेसच्या फेऱ्या घटल्याने कुर्डूवाडी आगाराला दररोज ४.५ लाखांचा फटका

Next

कुर्डूवाडी : दुसऱ्या टप्प्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे कुर्डूवाडी आगारातील अनेक बसेसच्या ग्रामीण व शहरी फेऱ्या रद्द झाल्या आहेत. काही बसेसच्या फेऱ्या सुरू असूनही प्रवासी मिळत नाहीत. त्याचा फटका एस.टी.बस आगाराला बसला आहे. दररोज सुमारे ४.५ लाखांचा फटका बसत असल्याचे आगारप्रमुख मिथुन राठोड यांनी सांगितले.

कोरोनामुळे सध्या आगाराला तोट्यातल्या दिवसांना सामोरे जावे लागत आहे. तोट्यात गेलेली व्यवस्था भरून काढण्यासाठी चालक, वाहकसह अधिकारीवर्गाकडून प्रयत्न सुरु आहेत. कडक संचारबंदीमुळे प्रवासी वर्गानेही एस.टी.कडे पाठ फिरवली.

बोरवली, पुणे, उदगीर,माजलगाव,औरंगाबाद, नगर, सातारा,परभणी,या लांब पल्याच्या व मध्यम पल्ल्याच्या बसेस सुरू केल्याने आगाराच्या उत्पन्नातवाढ झाली होती. पण १ एप्रिल पासून पुन्हा याच्यावर पूर्णपणे परिणाम झाला आहे. परिणामत: कुर्डूवाडी आगाराचे दररोजचे उत्पन्न ४ लाख ५० हजार इतके आहे. या एप्रिलमध्ये बसेस बंद असल्याने आर्थिक फटका आगाराला बसला आहे. आता येथील ४५ बसेसपैकी ४ बसेस व २४ कर्मचारी बेस्ट उपक्रमासाठी मुंबईला पाठवण्यात आले आहेत. पंढरपूर विधानसभा कामासाठी माढा तहसीलला तीन बसेस सोडल्या. त्यातून आगाराला फक्त ३० हजार रुपये उत्पन्न मिळाले.

--

३० कर्मचाऱ्यांचेच लसीकरण

३०३ कर्मचाऱ्यांपैकी ४५ वर्षाच्या पुढील कर्मचारी संख्या १०१ आहे. त्यापैकी ३० कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. येत्या तीन दिवसात सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात येणार असल्याचे आगार प्रमुख राठोड यांनी सांगितले.

----

४५ बसेस अन् ३०३ बसेस

कुर्डूवाडी आगारात एकूण ४५ बसेस असून कर्मचारी संख्या ३०३ आहे. चालक संख्या १२० वर आहे तर वाहक संख्या १०८ आहे. यांत्रिक कर्मचारी संख्या ४५ आणि प्रशासकीय कर्मचारी संख्या २० इतकी आहे. लॉकडाऊनपूर्वी आगाराच्या ५५ नियते चालू होते. वाहतूक पूर्वपदावर येत असताना ४३ नियते चालू होती.

Web Title: 4.5 lakh daily hit Kurduwadi depot due to reduction in bus services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.