शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत पडला ३७ मि.मी. पाऊस; सीना नदीला आले पाणी.

By दिपक दुपारगुडे | Updated: October 2, 2023 19:33 IST

या पावसामुळे रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

सोलापूर : संपूर्ण ऑगस्ट महिना ढगांकडे बघायला लावून सप्टेंबर महिन्यात जेमतेम पडलेला पाऊस ऑक्टोबर महिन्यात मात्र चांगला पडत आहे. सलग दोन दिवस पावसाने लावलेल्या हजेरीने शेतकरी सुखावला आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या दोन दिवसांत ३७.३ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

१ ऑक्टोबरच्या रात्री जिल्ह्यातील सर्वच मंडळात पावसाची नोंद झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील सोलापूर मंडळात तब्बल १२९ मि.मी. नोंद झाली आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्याची सुरुवातही कोरडीच झाली होती. सप्टेंबर अखेरला मात्र पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असताना ऑक्टोबर महिन्यात सलग दोन दिवस पाऊस पडतो आहे. शनिवारी जिल्ह्यात एकूण ३.३ मि.मी. तर रविवारी रात्री ३४ मि.मी. असा दोन दिवसांत ३७.३ मि.मी. पाऊस पडला. या पावसामुळे रब्बी पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.

सीना नदीला आले पाणी...मोहोळ व उत्तर तालुक्यातील नदीकाठच्या गावांत रविवारी रात्री पडलेल्या पावसामुळे सीना नदीला पाणी आले आहे. सोलापूर शहरात पडलेल्या पावसाचे पाणी बेलाटी, डोणगाव व तेलगाव शिवारातून सीना नदीला मिळत आहे. अकोलेकाटी - बीबीदारफळ - सावळेश्वर व नान्नज - बीबीदारफळ - सावळेश्वर असे दोन ओढे बीबीदारफळ गावाच्या दोन्ही बाजूंनी जातात. रविवारी रात्री पडलेल्या पावसामुळे अकोलेकाटी ओढा सकाळपासून वाहू लागला आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर