शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

मध्य रेल्वेचे ३५ हजार स्टेशन मास्तर १२ तास उपाशी राहून करणार काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 13:33 IST

अनोखे आंदोलन; रेल्वेच्या खासगीकरणाला विरोध, विविध मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक

सोलापूर : स्टेशन मास्तरांच्या विविध मागण्यांसाठी ३१ ऑक्टोबर रोजी अनोखे आंदोलन करण्यात येणार आहे़ १२ तास उपाशी राहून स्टेशन मास्तर कामावर कार्यरत राहणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाचे प्रमुख संजीवकुमार अर्धापुरे यांनी दिली.

नाईट ड्यूटी सीलिंग लिमिट ४३६०० चा आदेश रद्द करावा, ओपल लाईन स्टाफला ५० लाखांचा जीवन विमा देण्यात यावा, रेल्वेचे खासगीकरण आणि निगमीकरण बंद करण्यात यावे, या मागण्यांसाठी स्टेशन मास्तर आंदोलन करणार आहेत.

ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनच्या सोलापूर विभागाचे प्रमुख संजीवकुमार अर्धापुरे यांनी सांगितले की, या मागण्यांविरोधात पहिल्या टप्प्यामध्ये ई-मेलद्वारे रेल्वे बोर्ड अधिकाऱ्यांसमोर विरोध प्रकट केला आहे. दुसऱ्या टप्प्यात १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारत देशातील स्टेशन मास्तरांनी मेणबत्ती पेटवून रात्रपाळी करत लाक्षणिक आंदोलन केले़ तिसऱ्या टप्प्यामध्ये गाडी परिचालन करत करत २० ते २६ ऑक्टोबर पूर्ण एक आठवडा काळी फीत लावून विरोध दर्शविला आहे. यानंतरही प्रशासनाने कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष करून ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातून रात्रपाळी भत्त्याची कपात केली आहे. त्यामुळे आता चौथ्या टप्प्यात संपूर्ण भारतातील ३५ हजार स्टेशन मास्तर १२ तास संपूर्ण उपोषण करत कार्यरत राहणार असल्याचे सांगितले. या आंदोलनात सर्व स्टेशन मास्तरांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे