शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

बनावट फळबाग विम्याची ३,४०४ प्रकरणे आढळली; लोण पाेहोचले राज्यातील २४ जिल्ह्यांत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 08:09 IST

अंबिया बहार फळपिकांचा बनावट शेतकऱ्यांकडून भाडेकरार जमीन दाखवून, तसेच फळपीक नसताना विमा उतरल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.

- अरुण बारसकरलोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : बनावट विमामाफियांच्या दबावामुळे तपासणीत येणारे अडथळे पार करीत कृषी खाते धाडसाने फळपिकांची तपासणी करीत आहे. राज्यात आतापर्यंत फळबागा नसताना विमा भरलेली ३,४०४ बनावट प्रकरणे आढळून आली आहेत.

अंबिया बहार फळपिकांचा बनावट शेतकऱ्यांकडून भाडेकरार जमीन दाखवून, तसेच फळपीक नसताना विमा उतरल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते. कृषी खात्याकडून याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारला पत्र दिले होते. राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी या प्रकरणाची संपूर्ण तपासणीचे आदेश दिले असतानाच, केंद्रीय कृषी सचिवांनीही राज्याला तपासणीचे पत्र दिले होते. राज्यभरात सुरू असलेल्या तपासणीत आतापर्यंत ३,४०४ बनावट प्रकरणे उघडकीस आली आहेत.बनावट पीकविम्याचे लोण राज्यातील २४ जिल्ह्यांत असल्याचे आतापर्यंत आढळले असून, तपासणी अद्याप सुरूच असल्याचे सांगण्यात आले.यावर्षी राज्यात दोन लाख ४८ हजार ९२३ शेतकऱ्यांकडून फळपीकविमा भरला आहे. संपूर्ण फळबागांची कृषी सहायक, तलाठी व विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात अवघ्या ५२ हजार हेक्टरची तपासणी झाली आहे.

विमा कंपनीचेही लोक सहभागी?२०२१-२२ या वर्षीही असे प्रकार झाले. मात्र, सर्वांनाच मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाले आहेत. विमा कंपनीच्या काही लोकांना याची कल्पना होती. मात्र, त्यांनी गप्प राहण्याचे काम केले. त्याला कृषी खात्याकडूनही बळ मिळाले

जिल्हा    एकूण    तपास    अपात्र    अर्ज     अर्ज    अर्जअहमदनगर    २३०५    ८१४    ३१धुळे    २५०८    ८४२    २१नागपूर    ६५७    ५९१    ८नाशिक    १०९३    ९३८    १२सोलापूर    ४४१५    ८०९    ४७०वाशिम    १३    १३    ९यवतमाळ    १९३    १९३    २पालघर    ३४२९    ७१४    ५नंदुरबार    १७०४    ३५४    ३८रत्नागिरी    ३२३८    ३२४३    ७०सिंधुदुर्ग    ३८४६४    २५९३    १७अमरावती    ३६०३    ४०६    ४संभाजीनगर    ३६५२    १०५०    ९६जालना    ४७६८६    १०९५०    ११०५कोल्हापूर    २७९    २७९    ४७लातूर    ५३३    ५३३    ६सांगली    ७०७०    २६८२    ७४४सातारा    ५९९    ५९९    ५०ठाणे    ४७८८    ९८७    १९बीड    २३६९    ९७८    २०जळगाव    ७८४३०    ११८९९    ४११नांदेड    ११८३    ८३६    ५१धाराशीव    ६२४    ६२४    १६पुणे    ४३९    ४३९    २२२एकूण २,४८,९२३  ५२,०८६  ३४०४

टॅग्स :fraudधोकेबाजी