शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
4
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
5
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
6
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
7
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
8
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
9
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
10
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
11
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
12
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
13
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
14
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
15
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
16
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
17
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
18
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
19
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
20
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?

सोलापूर जिल्ह्यातील कर्जमाफी खातेदारांना देण्यास ३३ कोटी रुपयांची कमतरता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 10:29 IST

राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या यादीतील पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी  जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपये इतकी रक्कम अपुरी आहे.

ठळक मुद्देशासनाकडून आलेली रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली शिल्लक असलेली रक्कमही दुरुस्त यादीसाठी आवश्यकतपासणी केलेल्या यादीतील पात्र शेतकºयांसाठीही रक्कम अपुरी

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १२ : राज्य शासनाने दिलेल्या कर्जमाफीच्या यादीतील पात्र शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी  जिल्हा मध्यवर्ती बँकेला ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपये इतकी रक्कम अपुरी आहे. दीड लाखावरील खातेदारांच्या रकमेचा विषय वेगळाच असल्याचे सांगण्यात आले.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकी सन्मान कर्जमाफी योजनेसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला आतापर्यंत ८१ हजार ८९६ शेतकºयांची यादी आली आहे. या शेतकºयांसाठी बँकेच्या माहितीप्रमाणे ३०९ कोटी ३९ लाख ५६ हजार १९३ रुपयांची आवश्यकता आहे, परंतु शासनाने २७५ कोटी ६१ लाख ६४ हजार २०० रुपये दिले आहेत. शासनाने दिलेल्या यादीपैकी ६० हजार १३८ शेतकºयांची कर्जाबाबतची तपासणी केल्यानंतर ४६ हजार ४७ शेतकºयांची माहिती बरोबर आढळली तर १४ हजार ९१ शेतकºयांच्या नावात व रकमेत चुका आढळल्या आहेत. यामध्ये दीड लाखावरील खातेदारांची संख्या २१ हजार ७५८ इतकी आहे. राज्य शासनाकडून पहिल्या टप्प्यात आलेल्या ३० लाभार्थ्यांपैकी २४ शेतकºयांच्या खात्यावर १२ लाख ३९ हजार ९३ रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर दोनवेळा आलेल्या यादीतील ४४ हजार ७४० शेतकºयांच्या कर्ज खात्यावर २२७ कोटी ४८ लाख ७५ हजार ५६० रुपये बँकेने जमा केले असल्याचे सांगण्यात आले.  तपासणीत त्रुटी आढळलेल्या शेतकºयांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली असून, शासनाकडून दुरुस्तीची यादी आल्यानंतर बँकेकडे शिल्लक असलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. शासनाकडून आलेल्यापैकी तपासणी करून बरोबर असलेल्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी ३३ कोटी ७७ लाख ९९ हजार ९९३ रुपयांची गरज आहे. याशिवाय उर्वरित आॅनलाईन अर्ज भरलेल्या शेतकºयांची यादी व पैसे शासनाकडून आलेली नसल्याचे सांगण्यात आले.------------------------४४ हजार ७६६ शेतकरी कर्जमुक्त- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी आतापर्यंत आलेल्या २७५ कोटी ६१ लाख ६४ हजार २०० रुपयांपैकी २२७ कोटी ६१ लाख १४ हजार ६५३ रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा केले.- ६० हजार १३८ शेतकºयांच्या यादी तपासणीत १४ हजार ९१ शेतकºयांच्या नावात निघाल्या दुरुस्त्या.- बँकेच्या एकूणच एक लाख २३ हजार ७५४ खातेदारांची माहिती शासनाला पाठवली होती, त्यापैकी ४४ हजार ७६६ शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा झाली. - दीड लाखावरील रक्कम जे शेतकरी भरणा करतील त्यांची माहिती व रक्कम शासनाकडे मागणी केली जाणार आहे. शासनाकडून रक्कम आल्यानंतरच खात्यावर जमा होणार आहे.---------------------शासनाकडून आलेली रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा केली आहे. शिल्लक असलेली रक्कमही दुरुस्त यादीसाठी आवश्यक आहे. तपासणी केलेल्या यादीतील पात्र शेतकºयांसाठीही रक्कम अपुरी पडते. आणखीन किमान १०० कोटींची आवश्यकता आहे. - राजन पाटील, अध्यक्ष, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरी