शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार २२५ उमेदवारांसाठी चार तासात झाले ३२.५२ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 13:26 IST

१२,२२५ उमेदवार रिंगणात ; २,७९५ केंद्रांवर शांततेत सुरू आहे मतदान

सोलापूर : जिल्ह्यातील ५९० ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरवात झाली. सायंकाळी साडेपाचपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. ५९० ग्रामपंचायतींमध्ये एकूण १२,२२५ उमेदवार आपली राजकीय शक्तीपणाला लावली आहे. यातूनच ५९० गावकारभारी प्रथम सदस्य म्हणून निवडून येणार आहे. पहिल्या चार तासात ३२.५२ टक्के मतदान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे.

मतदानप्रक्रिया शांत आणि निपक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एकूण १८ हजार अधिकारी व कर्मचारी याकरिता परिश्रम घेत आहेत. एकूण २,२९६ प्रभागात निवडणूक होत आहे. यात ३ हजार ४७५ महिला उमेदवारदेखील महिला शक्तीचा जोर आजमावत आहेत.

जिल्ह्यात एकूण २०० गावे संवेदनशील आहेत. या ठिकाणी पाेलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त आहे. बहुतांश गावात निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. जिल्ह्यातील फक्त ६७ ग्रामपंचायतींना यात यश आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांत २०० गावेे संवेदनशील आहेत. त्याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तासाठी पुणे, सांगली व सोलापूर शहरातून पोलीस बळ मागविण्यात आला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.

————-

आरोग्य पथक तैनात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रासमोर विशेष काळजी घेतली जात आहे. मतदात्यांना मास्क बंधनकारक करण्यात आला आहे. मतदान केंद्रात येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझर देण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्राच्या इमारतीबाहेर एक आरोग्य पथक तैनात करण्यात आला आहे. कोरोनासदृश्य स्थिती असलेल्या मतदारांना सायंकाळी साडेचार ते ५.३० दरम्यान मतदान करता येणार आहे.

तालुकानिहाय झालेले मतदान असे...(११.३० वाजेपर्यंत)

करमाळा - ३१.७४ टक्के

माढा - ३०.६७ टक्के

बार्शी - ३१.३० टक्के

उत्तर सोलापूर - ३३.७३ टक्के

मोहोळ - ३३.५९ टक्के

पंढरपूर - ३४.४३ टक्के

माळशिरस - ३०.८३ टक्के

सांगोला - ३४.११ टक्के

मंगळवेढा - ३०.८९ टक्के

दक्षिण सोलापूर - ३३.६३ टक्के

अक्कलकोट - ३१.३६ टक्के

एकूण -३२.५२ टक्के

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायतVotingमतदान