शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

राजकीय पक्षांच्या सभांसाठी सोलापुरातील पार्क स्टेडियमसह ३२ पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 10:29 IST

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होणाºया राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसाठी महापालिकेने शहरातील ३२ जागा निश्चित केल्या आहेत. यामध्ये पार्क ...

ठळक मुद्देराजकीय सभांसाठी होम मैदान उपलब्ध नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केलेमहापालिकेच्या मालकीच्या जागांची यादी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे देण्यात आलीपोलीस प्रशासनाची चर्चा करून निवडणूक कार्यालयाने या जागा निश्चित केल्या

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होणाºया राजकीय पक्षांच्या जाहीर सभांसाठी महापालिकेने शहरातील ३२ जागा निश्चित केल्या आहेत. यामध्ये पार्क स्टेडियमचाही समावेश आहे. 

महापालिकेच्या मालकीच्या जागांची यादी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे देण्यात आली होती. पोलीस प्रशासनाची चर्चा करून निवडणूक कार्यालयाने या जागा निश्चित केल्या आहेत. यामध्ये सावरकर मैदान (आसार मैदान), मजरेवाडी शाळा, नेहरूनगर क्रीडांगण, सेटलमेंट समाज मंदिर, पुंजाल मैदान शांती चौक, हुडको क्र. ३ क्रीडांगण, दाजी पेठ क्रीडांगण, जयभवानी प्रशाला, चिल्ड्रन पार्क लगत असलेली खुली जागा कर्णिक नगर, जुनी मिल कपाउंड लक्ष्मी पेठ, कर्णिक नगर- फुटबॉल मैदान, पार्क स्टेडियम, संभाजी तलाव लगत असलेली राणी लक्ष्मीबाई खुली जागा, भैय्या चौक, कन्ना चौक, जुळे सोलापूर चौक, महावीर चौक, बाळीवेस चौक, जगदंबा चौक, विजापूर वेस चौक, नई जिंदगी चौक, सलगर वस्ती चौक, बेडरपूल चौक, कुमठा नाका चौक, जिल्हा परिषद गेट चौक, माधव नगर चौक, विडी घरकूल चौक, दत्त नगर चौक, मिलिंद नगर चौक, सम्राट चौक, दयानंद कॉलेज चौक, शेळगी चौक. 

यंदा होम मैदान नाहीच- शहरातील होम मैदान हा जाहीर सभांसाठी सर्वाेत्तम पर्याय होता. या मैदानावर एखाद्या पक्षाची दमदार सभा झाली की मतदारसंघातील वातावरण त्याच पक्षाच्या दिशेने वाहत असल्याचे अनेकदा दिसून आले. यंदा स्मार्ट सिटी योजनेतून होम मैदानाचे सुशोभीकरण झाले आहे. गड्डा यात्रा वगळता इतर काळात मैदानावर वाहने आणण्यास मनाई आहे. राजकीय सभांसाठी हे मैदान उपलब्ध नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस