शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
3
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
4
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
5
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
6
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
7
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
8
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
9
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
10
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
11
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
12
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
13
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
14
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
15
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
16
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
17
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
18
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
19
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
20
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”

आर्यन शुगरसह ३० बिगरशेतीचे आदेश रद्द, बार्शी तहसीलदारांचे आदेश प्रांताधिकाºयांकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 12:18 IST

बिनशेतीचे आदेश देताना नगररचना विभागाकडून रेखांकन मंजुरीबाबत अभिप्राय न घेतल्याचा ठपका ठेवून प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी बार्शी तालुक्यातील आर्यन शुगरसह ३० जणांना दिलेले बिनशेती आदेश रद्द केले आहेत.

ठळक मुद्देतहसीलदारांनी या प्रकरणात दिलेले आदेश अवैध आहेत, असा शेराही प्रांताधिकाºयांनी नोंदविलासोलापुरात बोगस बिनशेतीची अनेक प्रकरणे उघडकीस आली. परंतु, ती दाबण्यात आलीजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यात लक्ष घालण्याची गरज सहायक संचालक नगररचना विभागाचा अभिप्रायही घेण्यात आला नसल्याचे नमूद

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३१ : बिनशेतीचे आदेश देताना नगररचना विभागाकडून रेखांकन मंजुरीबाबत अभिप्राय न घेतल्याचा ठपका ठेवून प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी बार्शी तालुक्यातील आर्यन शुगरसह ३० जणांना दिलेले बिनशेती आदेश रद्द केले आहेत. तहसीलदारांनी या प्रकरणात दिलेले आदेश अवैध आहेत, असा शेराही प्रांताधिकाºयांनी नोंदविला आहे.जिल्हा प्रशासनाकडून २०१२ च्या दरम्यान देण्यात आलेले अनेक बिनशेती आदेश वादाच्या भोवºयात अडकलेले आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी अशा अनेक आदेशांची पोलखोल केली होती. यात जिल्हा प्रशासनातील अनेक अधिकारी, कर्मचारी अडकलेले आहेत. बार्शी आणि उत्तर सोलापूरचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांच्याकडे अशा प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. यातही बार्शी तालुक्यातील ३० प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. प्रतिवादींना संधी देण्यात आली. यात अनेकांनी म्हणणे मांडलेही नाही. अनेक जमिनींना अकृषकची परवानगी देताना जमिनीची मोजणी करण्यात आली नसल्याचा शेराही मारण्यात आला आहे. शिवाय सहायक संचालक नगररचना विभागाचा अभिप्रायही घेण्यात आला नसल्याचे नमूद केले आहे. यातील आदेश रद्द करुन अकृषक आदेशापूर्वीचा ७/१२ सध्याच्या मालकी हक्क असणाºया व्यक्तीच्या नावे करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. --------------------यांचे आदेश रद्द...- संदीप मस्तुद (उपळाई ठोंगे), साहेबराव पाटील व इतर (रंतजन), सिध्देश्वर मुंबरे (मळेगाव), जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे अनिल सावंत (अलिपूर), श्रीनिवास पतंगे व इतर (बळेवाडी), प्रभाकर पाटील (खामगाव), नितीन व सौदागर नवगिरे (गाताचीवाडी), श्रीनिवास पतंगे व इतर (गाडेगाव), कपिल मौलवी व इतर (गाडेगाव), रावसाहेब जाधव (तांदूळवाडी), संजयकुमार खेंदाड (सासुरे), संजय गाला (दडशिंगे), तानाजी पवार व इतर (उपळाई ठोंगे), रवींद राऊत व इतर (गाताचीवाडी), अरुण ताटे व इतर (मानेगाव), कांतीलाल मांडोत (खांडवी), आप्पासाहेब गावसाने (सौंदरे), शिवप्रभू धतुरगाव (सौंदरे), पांडुरंग इंगळे (सौंदरे), प्रशांत शेटे (मानेगाव), दत्तात्रय सोनवणे (जामगाव आ), आर्यन शुगर (खामगाव), रणजित देशमुख (रातंजन), किसन राक्षे (खांडवी), सीमा दसंगे (जामगाव आ), संजय चित्राव (जामगाव आ), आनंदराव जगदाळे (उपळाई ठों), अलका साळुंखे व इतर (अलिपूर), लक्ष्मीबाई, रामचंद्र, सतीश जाधव (अलिपूर), चंद्रसेन ढेंगळे (मानेगाव). ----------------जिल्हाधिकाºयांकडून अपेक्षा- सोलापुरात बोगस बिनशेतीची अनेक प्रकरणे उघडकीस आली. परंतु, ती दाबण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय