शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

coronavirus; सोलापुरात मध्य रेल्वेचे १६ आयसोलेशन वॉर्ड; दोन डॉक्टरांसह ११ जणांची टीम हाय अलर्टवर

By appasaheb.patil | Updated: March 18, 2020 12:04 IST

रेल्वे स्थानकावरील फलाटांवरही जनजागरण; वैद्यकीय अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या सुट्ट्या रद्द, कोरोनाचा सामना करण्यासाठी रेल्वे सज्ज

ठळक मुद्देकोरोना व्हायरस या आजाराच्या जनजागृतीसाठी रेल्वे वसाहती, विभागीय रेल्वे कार्यालयात आणि रेल्वे कॉलनीमध्ये पत्रके वाटपसोलापूरच्या रेल्वे रुग्णालयाच्या फरशा, खिडक्या, रेलिंग इत्यादी सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनचा वापर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असलेल्या डॉ़ कोटणीस स्मारक रेल्वे हॉस्पिटलमध्ये १६ आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले

सुजल पाटील

सोलापूर : देशभरात कोरोना (कोविड -१९) या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे़ महाराष्ट्रातही या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत़ हा साथीचा आजार पसरू नये यासाठी सर्वच शासकीय कार्यालये सज्ज झाली आहेत़ दरम्यान, मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागाने कोरोना विषाणूपासून बचाव व नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या आहेत. १६ आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले. २ डॉक्टर्स अन् ९ कर्मचाºयांची टीम २४ तास येथील वैद्यकीय सेवा देण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वे वैद्यकीय विभागाचे प्रमुख डॉ़ आनंद कांबळे यांनी ‘लोकमत’ ला दिली.

कोरोना आजाराबाबत जागरुक राहण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून देशातील सर्वच रेल्वे स्थानकातील विभागीय व्यवस्थापकांना कळविले आहे़ याबाबत रेल्वे मंत्रालय प्रशासन व मंत्र्यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाºयांशी संवाद साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यादृष्टीने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात येणाºया सर्वच रेल्वे स्थानकांवर उपाययोजना करण्यात आल्या आहेत़ कोरोना आजाराबाबत कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्मवर गाड्यांच्या वेळेबाबतच्या घोषणेसोबत कोरोना होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याशिवाय बुकिंग कार्यालये, चौकशी काउंटर, टीटीई इत्यादी कर्मचारी मास्क घालून काम करीत आहेत़ सार्वजनिक ठिकाणी काम करणाºया कर्मचाºयांना सॅनिटायझर दिले जात आहे. स्थानकांवर वाणिज्य विभागामार्फत कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे़ स्थानकांवरील आॅडिओ आणि टीव्हीद्वारे कोरोना विषाणूविषयी संदेश प्रसारित करण्यात येत आहेत.

डॉक्टर्स अन् कर्मचाºयांसाठी प्रोटोकॉल...- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात असलेल्या डॉ़ कोटणीस स्मारक रेल्वे हॉस्पिटलमध्ये १६ आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत़ या १६ वॉर्डासाठी कोरोना संशयित प्रकरणे हाताळण्यासाठी प्रशिक्षण पूर्ण केलेले २ डॉक्टर (डॉ.मंजूनाथ, डॉ.रवीचंद्रा) आणि ९ पॅरामेडिकल कर्मचाºयांची टीम तयार करण्यात आली आहे.यात ३ सिस्टर,तीन सफाई कर्मचारी व अन्य तिघांची नियुक्ती केली आहे. याशिवाय रुग्णालयातील कर्मचाºयांसाठी पीपीई (वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे) साठी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर आणि मास्कचा पुरवठा करण्यात आला आहे़ रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफमध्ये मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रोटोकॉल प्रसारित करण्यात आला आहे़ शिवाय रेल्वे रुग्णालय, सोलापूर येथे इन्फ्रारेड कॉन्टॅक्टलेस थर्मामीटरची व्यवस्था केली आहे. वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णांसाठी अँटीव्हायरल बॅरियर कीट विकत घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे सोलापूर विभागाचे व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी दिली़

सोडियम हायपोक्लोराईड सोल्युशनचा वापर- जी संशयास्पद प्रकरणे आहेत ती सिव्हिल हॉस्पिटल सोलापुरात संकलन व चाचणीसाठी संदर्भित करण्यासाठी हे कार्यालय सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी, नोडल अधिकारी आणि जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या संपर्कात आहे. सर्व आरोग्य युनिट आणि उपविभागीय रुग्णालय, स्थानिक आरोग्य प्राधिकरणाशी संपर्क साधून या नमुन्यांचा संदर्भ घेण्यासाठी आणि स्थानिक अधिसूचित प्रयोगशाळांमधील प्रकरणांचा संदर्भ घेत आहेत. दरम्यान, सोलापूरच्या रेल्वे रुग्णालयाच्या फरशा, खिडक्या, रेलिंग इत्यादी सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशनचा वापर करून दिवसातून किमान पाच ते सहा वेळा साफसफाई व स्वच्छता करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़ 

रेल्वे वसाहत, कॉलनी व कार्यालयात जनजागृती...- कोरोना व्हायरस या आजाराच्या जनजागृतीसाठी रेल्वे वसाहती, विभागीय रेल्वे कार्यालयात आणि रेल्वे कॉलनीमध्ये पत्रके वाटप करण्यात आली आहेत.  संपूर्ण सोलापूर विभागातील विविध स्थानकावर उद्घोषणा (पीए सिस्टम) व्दारे घोषणा केली जात आहे. वाणिज्य विभागातर्फे सोलापूर विभागातील विविध स्थानकांवर व्हिडिओ क्लिपिंगही प्रदर्शित करण्यात येत आहे. पत्रिका वाटप करताना आरोग्य निरीक्षकांव्दारे कॉलनीमध्ये जनजागृती केली जाते. कोरोना (कोविड -१९) च्या जनजागृतीसाठी रुग्णालयातील महिला कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांना रेल्वे हॉस्पिटल कॉन्फरन्स हॉलमध्ये व्याख्यान दिले जात आहे़  रेल्वे रुग्णालय सोलापूर येथे एक नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी दिली़ 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वे