यावेळी राष्ट्रवादीचे राज्य उपाध्यक्ष दीपक साळुखे-पाटील, जिल्हा सरचिटणीस लतीफ तांबोळी, जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, बांधकाम सभापती प्रवीण खवतोडे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, सोमनाथ माळी आदी उपस्थित होते. मंगळवेढा नगरपरिषदेस पाच कोटी रुपये निधी देण्यास पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तत्त्वतः मान्यता दिली होती. त्यानुसार मंगळवेढा नगरपरिषदेस विविध विकास कामास निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून मंगळवेढा शहरातील देवस्थान सभामंडप, स्मशानभूमी कंपाऊंड, वेटिंग शेड, परिसर सुशोभिकरण, बगिचाचा विकास, शाळेचे कंपाऊंड, गटार बांधकाम, रस्ते काँक्रिटीकरण, लाईट पोल उभारणे, स्ट्रीट लाईट, हायमास्ट दिवे बसविणे, रस्ते डांबरीकरण आदी विविध विकासकामे केली जाणार आहेत.
यासाठी नगराध्यक्ष अरुणा माळी, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, बांधकाम समिती सभापती प्रवीण खवतोडे, नगरसेवक प्रशांत यादव, अनिल बोदाडे, राहुल सावंजी, रामचंद्र कोंडुभैरी, पांडुरंग नाईकवाडी, संकेत खटके, बशीर बागवान, नगरसेविका भागीरथी नागणे, अनिता नागणे, सुमन शिंदे, निर्मला माने, राजश्री टाकणे, सब्जपरी मकानदार, लक्ष्मी म्हेत्रे, रतन पडवळे, पारूबाई जाधव यांनी प्रयत्न केले.