शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

दामाजी कारखान्यात २८ कोटींचा गैरव्यवहार; ९० हजार साखरेच्या पोत्याची परस्पर विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 10:21 IST

विशेष लेखापरीक्षकाचा ठपका ; साखर सहसंचालकाकडे अहवाल सादर

मंगळवेढा : मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कारभाराबाबत सहकारी संस्थेच्या वर्ग १ चे विशेष लेखापरीक्षक जी.व्ही. निकाळजे यांनी तपासणीत गंभीर दोष नोंदवले आहेत. त्याबाबतचा अहवाल त्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांना सादर केला आहे.

या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभाराबाबत अशोक कृष्णा जाधव व इतर २१ जण यांनी दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी पत्र लिहून कारखान्याच्या कारभारावर आक्षेप नोंदवले होते. त्यामध्ये लेखापरीक्षक जी.व्ही. निकाळजे यांनी केलेल्या तपासणीत आक्षेप आढळले.

२०१७-१८ व २०१८-१९ मध्ये उत्पादित झालेली साखर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई यांच्याकडे माल तारण कर्जापोटी ताब्यात दिली. तक्रारदाराने ७५ हजार क्विंटल साखर कमी असल्याचे अर्जात म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात ९० हजार ६७० क्विंटल साखर कारखान्याने सदर बँकेस न कळवता परस्पर विक्री केली.

  बँकेचे तपासणी अधिकारी देखील या प्रकरणात सामील असून या साखर विक्रीपोटी २८ कोटी १३ लाख ४ हजार ७८० रक्कम बँक कर्ज खात्यामध्ये जमा न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावली.

या साखर विक्रीची रक्कम माल तारण खात्यात भरणा न केल्यामुळे नाहक व्याजाचा भुर्दंड कारखान्याला सोसावा लागला. सदरच्या आर्थिक नुकसानीस तत्कालीन कार्यकारी संचालक व संचालक मंडळ जबाबदार असल्याचा ठपका ठेवला.

 साखर विक्री टेंडरबाबतची जाहिरात जास्त खप असलेल्या वर्तमानपत्रात दिली नसल्याचे निदर्शनास आले. या नियमबाह्य पद्धतीमुळे साखर विक्री केल्याने स्पर्धात्मक दराचा फायदा कारखान्यास मिळाला नाही.कारखान्यावर साधारणत २०० कोटीचे कर्ज आहे, गेल्या महिन्यापासून कारखान्यातील कामगार पगारापोटी ६ कोटी ७० लाख ६१ हजार ७९९ रूपये झाले थकीत आहेत. प्रायव्हेट फंडाच्या २ कोटी ७३ लाख ८४ हजार १६० रकमेचा भरणा केला नाही.कारखान्यांमधील ३८ कर्मचारी मयत असून , त्यांची ३१ लाख ५२ हजार ५३३ इतकी रक्कम अद्याप देणे आहे. सदर रक्कम थकीत राहण्याच्या कारणाचा खुलासा मागणी करून सादर केला नाही.

सन २०१८-१९ या कालावधीतील ताळेबंद व नफा-तोटा पत्रक संशयास्पद वाटत असल्याचे तक्रारदाराने नमूद केले. याबाबत या वर्षाचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यासाठी तक्रारदाराने कोणत्या सालातील ताळेबंद व नफा तोटा याचा उल्लेख केला न करता कंपनी संशयास्पद म्हटले आहे --------------------------------------लेखापरीक्षण अहवालाबाबत कारखान्याचे चेअरमन संचालक मंडळाबरोबर  सविस्तर चर्चा करण्यात येईल त्यानंतर याबाबत आम्ही आमचे म्हणणे प्रसिद्धीसाठी देऊ-झुंझार आसबे ,

कार्यकारी संचालक, दामाजी कारखाना मंगळवेढा

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखाने