शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोन दंगलीत साथ दिलेल्या २७० ढाली करताहेत मुख्यालयातील वृक्षांचे रक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 12:11 IST

सोलापूर पोलीस दल - पर्यावरणाच्या संवर्धनासाठी खाकी सरसावली...

सोलापूर : दररोज छोट्या-मोठ्या घटना आसपास घडत असतात. यातूनच एखादी मोठी हिंसक घटना होत असे. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांना पुढे यावे लागते. त्या वेळी पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी एका हातात काठी  आणि दुसऱ्या हातात समोरील दगड, अथवा आपल्यावर होणारे हल्ला रोखण्यासाठी लोखंडी ढाल असायची. दोन दंगलींत चांगलीच साथ दिलेल्या अशा २७० ढाली आता मुख्यालयातील वृक्षांचे रक्षण करीत असताना पोलिसांनी टाकाऊपासून टिकाऊ हा उपक्रम यशस्वी केला आहे.  

पहिल्या ढाली निवृत्त होऊन आता पोलीस मुख्यालयामध्ये झाडांची सुरक्षा करीत आहेत. पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी पूर्वी हातात लोखंडी मोठी ढाल असायची. ती जाळीदार होती. ढाल जाळीदार असल्यामुळे त्यातून छोटे खडे, माती पोलिसांच्या शरीरावर पडत असे. ही लोखंडी ढाल वजनाने जास्त असल्यामुळे पोलिसांनाही कारवाईवेळी थोडे अवघड होत असे. यामुळे वेळेनुसार या ढालीच्या जागी आता नवीन फायबरची ढाल पोलिसांच्या मदतीला आली आहे. ही चांगल्या दर्जाची पारदर्शक आणि वजनाने हलकी असल्यामुळे पोलिसांना हिचा फायदा होत आहे. 

सोलापूर शहर मुख्यालयात अशा जुन्या झालेल्या लोखंडी ढालींनी कम्पाउंड, झाडांसाठी सुरक्षा भिंत तयार करण्यात आली आहे.  या ढाली १९९२ आणि २००२ या दोन्ही दंगलींमध्ये पोलिसांच्या मदतीला आल्या होत्या. आता हे ‘गार्ड’ सध्या झाडांचे संरक्षण करीत आहेत. २००४ साली या गार्डच्या ऐवजी फायबर ढाल बाजारात आल्या. त्यानंतर लोखंडी ढाल वापरणे बंद करण्यात आले. या ढालींचा उपयोग करून जवळपास अर्धा किलोमीटरचे कम्पाउंड तयार करण्यात आले आहे. यासाठी जवळपास दोन  दिवस पोलिसांना श्रमदान करावे लागले. प्रत्येक ढाल ही ३ बाय २ फुटांची आहे. 

पोलीस जास्त कल्पक नसतात किंवा संवेदनशील नसतात, असा आरोप केला जातो. पण, पोलिसांनीच या लोखंडी शिल्ड अर्थात ढालींचा वापर कल्पकतेने केला आहे. यामुळे झाडांचे संरक्षणही होत आहे व सौंदर्यात भरही पडत आहे. - डॉ. दीपाली धाटे, पोलीस उपायुक्त

दोन दंगलीत वापरलेल्या जवळपास २७० ढाली (गार्ड) वापरात येत नव्हत्या. त्यांचा पुनर्वापर व्हावा म्हणून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांच्या मार्गदर्शनाखाली या ढालींचा वापर करण्यात आलेला आहे.- भगवान टोणे, पोलीस निरीक्षक 

 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसenvironmentपर्यावरण