शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींसाठी २५३ केंद्रांवर मतदान, जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 13:22 IST

जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २६ डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

ठळक मुद्दे२७ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे१ लाख ५५ हजार ८८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार या निवडणुकीतही थेट जनतेतून सरपंच निवडण्यात येणार प्रशासकीय यंत्रणेने मतदान आणि मतमोजणीची तयारी सुरू केली

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी २६ डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ६४ ग्रामपंचायतीचे ६४ सरपंच आणि ६५० सदस्यांसाठी २५३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. जिल्ह्यातील टेंभुर्णी, माळीनगरसह ६४ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीतही थेट जनतेतून सरपंच निवडण्यात येणार आहे. गावागावात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेने मतदान आणि मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकताच निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. प्रशासकीय यंत्रणेने कामात कुचराई करू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. २७ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ------------------------एकूण १ लाख ५५ हजार ८८७ मतदार४६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी एकूण १ लाख ५५ हजार ८८७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ७३ हजार १७१ स्त्रियांचा तर ८२ हजार ७१६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. ------------------येथे होणार मतमोजणीया ग्रामपंचायतीची मतमोजणी २७ डिसेंबरला होणार आहे. त्यासाठी तालुकानिहाय ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. करमाळा : तहसील कार्यालय आवार, माढा : शासकीय धान्य गोदाम, बार्शी : शासकीय धान्य गोदाम उपळाई रोड, पंढरपूर : शासकीय धान्य गोदाम, माळशिरस : तहसील कार्यालय, सांगोला : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृतीभवन, मंगळवेढा : शासकीय धान्य गोदाम क्र. ५, दक्षिण सोलापूर : तहसील कार्यालय आवार, अक्कलकोट : तहसील कार्यालय---------------------६३ निवडणूक निर्णय अधिकारी६४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ६३ निवडणूक निर्णय अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर २८ क्षेत्रिय अधिकारी, २८४ मतदान केंद्राध्यक्ष, २८४ मतदान अधिकारी, ५६८ इतर मतदान अधिकारी, २९२ शिपाई, ११८६ इतर अधिकारी, कर्मचारी आणि २९९ पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय