शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटी न भरणारे सोलापुरातील २४ व्यापारी रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:50 IST

त्रिंबक ढेंगळे यांची माहिती : वसुलीची कारवाई पूर्ण करणार

ठळक मुद्देअभय योजनेत अर्ज न केलेले सुमारे ४५०० व्यापारी५३६ व्यापाºयांकडे एलबीटीची मोठी थकबाकी व्यापाºयांची वार्षिक उलाढाल ५० लाखांपेक्षा अधिक

सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्था करातून (एलबीटी) आतापर्यंत महापालिकेला ४६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहेत. परंतु, अद्यापही शहरातील बड्या २४ व्यापाºयांकडे मोठी थकबाकी आहे. या व्यापाºयांकडील वसुलीसाठी कर निर्धारणाची कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. 

राज्य शासनाने जकात बंद करून २०११ मध्ये एलबीटीची आकारणी सुरू केली होती. व्यापाºयांच्या विरोधानंतर एलबीटी बंद झाली. परंतु, दरम्यानच्या काळात व्यापाºयांना एलबीटीची आकारणी करण्यात आली होती. शहरातील अनेक व्यापाºयांकडे अद्यापही एलबीटीची थकबाकी आहे. ही थकबाकी भरण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना जाहीर केली होती. 

या योजनेत अर्ज केलेल्या व्यापाºयांचे सर्व अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. आता सराफ, आॅटोमोबाइल्स, कारखानदार, कंत्राटदार अशा २४ जणांना रडारवर घेण्यात आले आहेत. या २४ व्यापाºयांना व्याजासह थकबाकी भरण्यास नोटीस बजावण्यात आली आहे. यानंतर अभय योजनेतील सर्व काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर अर्ज न केलेल्या व्यापाºयांची कर निर्धारण वसुली करण्यात येणार आहे. 

कर्मचाºयांना टार्गेट दिले- अभय योजनेत अर्ज न केलेले सुमारे ४५०० व्यापारी आहेत. त्यातील ५३६ व्यापाºयांकडे एलबीटीची मोठी थकबाकी आहे. या व्यापाºयांची वार्षिक उलाढाल ५० लाखांपेक्षा अधिक आहे. अशा व्यापाºयांचे सीएंकडून कर निर्धारण करून घेतले जात आहे. या व्यापाºयांना नोटिसा देऊन वसुलीचे काम सुरू केले जाणार आहे. एलबीटी वसुली अधिकाºयांना नियमितपणे आपल्या कामांचा आढावा सादर करायला सांगितल्याचेही ढेंगळे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाTaxकर