शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील दलित वस्तीचे १८ कोटी ९० लाख अखर्चित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 13:22 IST

दलित वस्त्या वंचित : राजकीय-प्रशासकीय अनास्थेचा परिणाम

ठळक मुद्देअनास्थेमुळे दलित वस्त्यांना विकासापासून वंचितकाय केले अतिरिक्त सीईओंनी ? जिल्हा परिषद सेस फंडाचा २ कोटींचा निधी अखर्चित

राकेश कदमसोलापूर : दलित वस्ती सुधार योजनेच्या कामावरून सोलापूर शहरात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या विरोधातील वातावरण पेटले असतानाच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाचा २०१६-१७ या वर्षातील १८ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याचे उघडकीस आले आहे. ग्रामपंचायत पदाधिकाºयांमधील हेवेदावे, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद प्रशासन अशा विविध स्तरावरील अनास्थेमुळे दलित वस्त्यांना विकासापासून वंचित राहावे लागले आहे. 

दलित वस्ती विकास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील दलित वस्त्यांमध्ये स्वच्छताविषयक सोयीसुविधा, पाणीपुरवठा, समाज मंदिर, अंतर्गत रस्ते, गटार आदी व्यवस्था करण्यासाठी निधी दिला जातो. प्रत्येक गावाला लोकसंख्येच्या निकषानुसार अनुदान दिले जाते. यासाठी पंचवार्षिक आराखडाही तयार केला जातो. 

दलित वस्ती सुधार योजनेच्या कामावरून मागील पंचवार्षिक आराखड्याची मुदत मार्च २०१८ मध्ये संपली आहे. गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात अनागोंदी माजली होती. त्याचा परिणाम दलित वस्ती सुधार योजनेवरही झाला आहे. २०१६-१७ या वर्षात जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला ५७ कोटी ९४ लाख रुपयांचा निधी देण्यात आला होता. हा निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत होती. मार्च २०१८ अखेर १८ कोटी ९० लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याची आकडेवारी पंचायत समितीस्तरावरुन सादर करण्यात आली आहे. 

काय केले अतिरिक्त सीईओंनी? जिल्हा परिषदेतील कामाचा भार पाहता वरिष्ठ अधिकाºयांमध्ये कामांची विभागणी करण्यात आली आहे. समाजकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, बांधकाम आदी विभागांची जबाबदारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे आहे. गेल्या वर्षभरात समाजकल्याण आणि पशुसंवर्धन विभागाबद्दल सर्वाधिक तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारींचा निपटारा करुन या विभागांना शिस्त लावण्याची आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे यांच्यावर होती. शिवाय ग्रामपंचायतींनी सादर केलेले प्रस्ताव आणि मंजूर झालेले प्रस्ताव याची पडताळणी करणेही गरजेचे होते. अधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य यांच्यातही सुसंवाद निर्माण करणे गरजेचे होते. परंतु, बनसोडे यांनी नेमके काय केले हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. 

दलित वस्ती सुधार योजनेसाठी जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठका घेतल्या. तत्कालीन विस्तार अधिकारी मेटकरी यांच्यामुळे कामांचे प्रस्ताव पडून राहतात, अशा तक्रारी सभापतींनीच केल्या होत्या. त्यामुळे मेटकरी यांना बदलण्यात आले. समाजकल्याण विभागाचे प्रभारी अधिकारी विजय लोंढे यांच्यामुळेही बराच निधी शिल्लक राहिला आहे. लोंढे यांच्यामुळे केवळ दलित वस्तीचा नव्हे तर जिल्हा परिषद सेस फंडाचा २ कोटींचा निधी अखर्चित राहिला आहे.- शीला शिवशरण,  सभापती, समाजकल्याण समिती, जिल्हा परिषद. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद