शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाह करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील १८१ जणांना मिळाले ९० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:26 IST

विवाह प्रोत्साहन योजना : राज्य सरकारकडून निधी मिळण्यास अडचण

ठळक मुद्देया योजनेतील लाभार्थीना केंद्र सरकारकडून २५ हजार तसेच राज्य सरकारकडून २५ हजार असे एकूण पन्नास हजारांचे अनुदान मिळतेचालू वर्षात पात्र लाभार्थी करिता राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त झाले नाहीकेंद्र सरकारचे २४ लाख रुपयांचे अनुदान शिल्लक असल्याचे प्रशासनाने सांगितले

बाळकृष्ण दोड्डीसोलापूर :  गतवर्षी २०१ वधू-वरांनी आंतरजातीय विवाह केला. पन्नास हजार रुपयांच्या शासकीय अनुदानासाठी २०१ दाम्पत्यांनी समाज कल्याण विभागाकडे अर्ज दाखल केला. यातील १८१ दांपत्य योजनेच्या अनुदानासाठी पात्र ठरले. उर्वरित २० दांपत्य विविध त्रुटीअभावी अपात्र ठरले. १८१ लाभार्थींना ९० लाख १५ हजारांचे अनुदान मिळाले.

मागासवर्गीय तसेच सवर्ण वर्गातील वधू-वरांचा विवाह झाल्यास आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत राज्य आणि केंद्र सरकारकडून विशेष अनुदान दिले जाते. चालू वर्षात या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ४० दाम्पत्य पात्र ठरले आहेत. राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त न झाल्याने या ४२ लाभार्थीं चालू वर्षात अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.

आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने योजनेला खीळया योजनेतील लाभार्थीना केंद्र सरकारकडून २५ हजार तसेच राज्य सरकारकडून २५ हजार असे एकूण पन्नास हजारांचे अनुदान मिळते. चालू वर्षात पात्र लाभार्थी करिता राज्य सरकारकडून अनुदान प्राप्त झाले नाही. केंद्र सरकारचे २४ लाख रुपयांचे अनुदान शिल्लक असल्याचे प्रशासनाने सांगितले. 

याेजनेचा लाभ कोणाला?मागासवर्गीय तसेच सवर्ण वर्गातील वधू-वरांचा एकमेकांशी विवाह झाल्यास त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. सदर वधू वर हे महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. मुलीचे वय १८ वर्ष तसेच मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण असावे. दोघांचाही प्रथम विवाह असावा. यासह अन्य कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्न